US President Joe Biden Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा रस्ता विसरल्याचे दिसून आले. असा एक व्हिडीओ समोर आलाय. जिथे जो बायडन इतरत्र फिरताना, गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. जी 7 संम्मेलन इटलीमध्ये होत आहे. यासाठी विविध देशाचे प्रमुख इटलीमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील इटलीत जाण्यासाठी पोहोचले आहेत. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेटतील.
पण पंतप्रधान मोदी पोहोचण्यााधीच जगभरातील महत्वाचे नेते इटलीत पोहोचले आहेत. इटलीने जी 7 चे यजमानपद स्वीकारले आहे. सर्व नेत्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार केला जातोय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वत: याकडे लक्ष देत आहेत. एक असा व्हिडीओ समोर आलाय, जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा हा व्हिडीओ आहे.
JUST IN: President Biden appears to start wandering off at the G7 summit and has to be handled back in.
Italian Prime Minister Giorgia Meloni was seen grabbing Biden to bring him back to the group.
This wasn't the only awkward encounter between the two. Biden was caught on… pic.twitter.com/xf8NizIVgH
— Collin Rugg (@CollinRugg) June 13, 2024
इटलीत जी 7 दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इतर देशांचे नेते दिसतायत. दरम्यान जो बायडन इतर नेत्यांपासून दूर जाताना दिसत आहेत. जी 7 ब्लॉक शिखर संमेलनाआधीचा हा व्हिडीओ आहे. बायडन आपल्या डावीकडे वळतात आणि जागतिक नेत्यांपासून दूसऱ्या बाजुस जाताना दिसतात. इटलीच्या पंतप्रधान त्यावेळी इतर नेत्यांशी संवाद साधताना दिसतात. पण त्यांचे लक्ष जो बायडन यांच्याकडे जाते. त्या प्रसंगावधन राखत जो बायडन यांच्याजवळ जातात. तात्काळ त्यांना ग्रुपमध्ये येण्याची विनंती करतातय. दरम्यान जो बायडन असे का करतात? असा प्रश्न सोशल मीडियातील यूजर्स विचारत आहेत.
जी 7 संमेलनात इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, युरोपियन आयोगच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांच्यासह अनेक प्रमुख G7 नेते व्हिडिओमध्ये एकत्र उभे आहेत.
बायडन या नेत्यांपासून दूर जाताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया देत आहेत. X वर शेअर केलेल्या या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना काय झाले आहे? ते वेगळे का चालले आहेत? अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
पंतप्रधान पदाची शपथ झाल्यानंतर मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी इटलीला जाणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या पंतप्रधानांना G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. ते पंतप्रधानांनी स्वीकारले आहे. 13 ते 15 जून दरम्यान इटलीमध्ये G7 देशांची शिखर परिषद होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी देशाचे प्रतिनिधित्व करतील. यावर्षी इटलीला G7 चे अध्यक्षपद मिळाले आहे. या शिखर परिषदेत जागतिक आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल आणि रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम, इस्रायल आणि हमासमधील संघर्ष यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. G7 देशांमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूके आणि यूएस यांचा समावेश आहे, युरोपियन युनियन अतिथी म्हणून चर्चेत सहभागी आहे. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर G7 नेत्यांची भेट घेणार आहेत.