मुंबई : पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राइक झालं आहे. सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारलं आहे आणि दोन सैनिकांना बाहेर काढलं आहे. हे सर्जिकल स्ट्राइक इराणने केलं असून इराण हा तिसरा देश बनला आहे ज्याने पाकिस्तान सीमेच्या आत जाऊन दहशतवाद्यांना कंठस्नानी पाठवलं आहे. या अगोदर अमेरिकेने नंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केलं होतं.
पाकिस्तानवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राइकला मंगळवारी रात्री सत्यात उतरवण्यात आलं. सुत्रांच्या माहितीनुसार यामध्ये पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेले आहेत. जे दहशतवाद्यांना कवर फायरिंग करत होते.
इराणचे रेवोल्यूशनरी गाइड्स (IRGC) ने गुप्त माहितीच्या आधारावर पाकिस्तानात खूप आतपर्यंत जाऊन हे ऑपरेशन केलं आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानच्या कैदत असलेल्या आपल्या दोन सैनिकांना सोडून आणलं आहे. IRGC शी संबंधित सुत्रांनी सांगितलं की, इराणच्या सैनिकांनी पाकिस्तानने अवैध पद्धतीने कब्जा केलेल्या बलोचिस्तानमध्ये घुसून जैश अल-अदलच्या कैद्यात असलेल्या दोन सैनिकांना मुक्त केलं आहे.
जैश अल अदील नावाच्या दहशतवादी संघटनेनं दोन इराणी सैनिकांचं दोन वर्षापूर्वी अपहरण केलं होतं. मंगळवारी रात्री इराणी सैन्याच्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या दोन सैनिकांना सुखरुपपणे सोडवलं. ३ फेब्रुवारी रोजी इराण सैनिकांनी आपले मिशन यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या २ जवानांना यशस्वीपणे मुक्त केल्याचं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तान इराणच्या दक्षिण-पूर्व परिसरताल हल्ले करत राहिला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये याच परिसरात इराणी जवानांनी बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक इराणी सैनिक मारले गेले. या हल्ल्यात अनेक इराणी सैनिक मारले गेले आणि अनेक सैनिक जखमी झाले. ऑक्टोबर २०१८ या दहशतवादी संघटनेने १४ इराणी सैनिकांचे अपहरण केले होते. इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानच्या प्रांतात मीरजावेह बॉर्डरवर ही घटना घडली. यामधील ५ सैनिकांना एका महिन्यात सोडलं.