जगाला भीती घालणारा हुकूमशाह किम जोंग, कोणासमोर नमतो...

सारं जग ज्याला घाबरतं, त्याच्या मनात कोणाची दहशत... एकदा पाहाचं...  

Updated: Apr 27, 2022, 10:27 AM IST
जगाला भीती घालणारा हुकूमशाह किम जोंग, कोणासमोर नमतो...  title=

मुंबई : उत्तर कोरियाने नुकताचं आपल्या सैन्याचा, कोरियन पीपल्स रिव्होल्युशनरी आर्मीचा 90 वा स्थापना दिवस साजरा केला. यादरम्यान, उत्तर कोरियामधून समोर आलेल्या फोटोंमध्ये, देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन राष्ट्रीय सैनिक स्मारकावर फुले अर्पण करताना दिसत आहेत, एवढंच नाही, तर ते स्मारकासमोर नमले देखील. उत्तर कोरियाचे  हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong) यांचे काही फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत.  

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये किम जोंग उन यांचं दुसरं रूप दिसत आहे. हे एक दुर्मिळ दृश्य आहे,  कारण किम जोंग उन यांची प्रतिमा एका हुकूमशहासारखी आहे. जो स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि कोणाच्याही पुढेही झुकत नाही. 

उत्तर कोरियामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम किंवा कायदे नाहीत, देशात किम जोंग उनच्या मर्जीनुसार सर्व कारभार चालतो. त्यामुळे  स्थापना दिनादरम्यान त्यांची दुसरी बाजू देखील जगाने पाहिली. 

जपानी राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या स्मारकासमोर किम जोंग उन नतमस्तक झाले. हे स्मारक उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या बाहेर  ताएसोंग-ग्योकमध्ये माउंट ताएसोंग वर स्थित आहे.

उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांचा जन्म 15 एप्रिल 1912 रोजी झाला. 1948 ते 1994 मध्ये उत्तर कोरियाच्या स्थापनेपासून देशावर राज्य केले. किम जोंग उन हे उत्तर कोरियावर राज्य करणाऱ्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. 

स्थापना दिना परेडमध्ये किम जोंग उन यांनी देशाची अण्वस्त्रे 'वाढवणार आणि विकसित करणार' अशी घोषणा केली. या परेडमध्ये 20 हजार सैनिक सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर कोरियाने 250 घातक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केल्याचा दावा केला जात आहे.