बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग ऊन यांची द्विपक्षीय चर्चा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील ऐतिहासिक बैठकीत अण्वस्त्रमुक्त होण्याचे मान्य केले गेलेय. आता चीनसोबत बोलणी केल्यानंतर उत्तर कोरिया अधिकच चर्चेत आहे.
अमेरिका-उत्तर कोरिया समझोता होणे आणि चीन-अमेरिका व्यापारयुद्ध भडकणे, या पार्श्वभूमीवर किम यांचा हा चीन दौरा आहे. गेल्या तीन महिन्यांत ते तिसऱ्यांदा येथे आले आहेत. दरम्यान, चीन आणि उत्तर कोरियाच्या द्विसंबंधांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सध्याच्या विकासाबाबत आणि कोरियन द्वीपकल्पातील परिस्थितीविषयी सूक्ष्मदृष्टीने चर्चा झाली. किम आणि जिनपिंग यांच्यात नक्की काय चर्चा होणार, याबाबत दोन्ही देशांकडून कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. योग्य वेळी निवेदन प्रसिद्ध करु, असे पत्रकारांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे काय चर्चा होणार याकडे लक्ष लागले होते.
Chinese President Xi Jinping held talks with the North Korean leader Kim Jong Un in Beijing to discuss the current development of China-DPRK relations and the situation in the Korean Peninsula in nuance
Read @ANI Story | https://t.co/CzOvADsUe4 pic.twitter.com/BonZHAUlNV
— ANI Digital (@ani_digital) June 20, 2018
उत्तर कोरियाने गेल्या काही काळात सातत्याने अण्वस्त्र चाचणी घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्यावर बरीच निर्बंधे घातली होती. अण्वस्त्रमुक्तीच्या निर्णयानंतर त्यांच्यावरील ही निर्बंधे उठवावीत, अशी मागणी रशियाने केली आहे. तसेच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात मैत्रीचे पाऊल पडल्यानंतर अमेरिका आता चीनशी उत्तर कोरियाची बोलणी झाल्याने किम जोंग ऊन अधिकच चर्चेत आहेत.