नवी दिल्ली: भूत, प्रेत, पिशाच्च, जादू-टोणा यांबाबतच्या कहाण्या, दंतकथा यांबाबत आपण नेहमीच आपण ऐकत असतो. पण, मृतदेह जर खरोखर स्वत:हूनच हालचाल करायला लागला तर, काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी. पण, अशा प्रकाराची प्रचिती चक्क डॉक्टरांच्या एका चमूलाही आली. ज्यामुळे डॉक्टरांचीही बोबडी वळली. वास्तवात ही घटना घडली आहे.
ही घटना आहे एका स्पॅनिश कैद्याबाबतची. काही कारणाने या कौद्याचा मृत्यू झाला. सरकारी नियमानुसार या कौद्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार होते. यासाठी कैद्याचा मृतदेह शवागारातून डॉक्टरांच्या टेबलवर नेण्यात आला. डॉक्टरांचा एक चमूही ज्या ठिकाणी मृतदेह ठेवला होता त्या ऑपरेशन थिएटरमध्ये आला. डॉक्टरांनी सर्व तयारी केली. शवविच्छदनासाठी लागणारे सर्व साहित्यही डॉक्टरांच्या टेबलवर आले. आणि इतक्यात त्या कैद्याचा मृतदेह चक्क हालचाल करू लागला. इतकी, त्याचे हात पाय, हालताना डॉक्टरांना चक्क डोळ्यासमोर दिसत होते. घडल्या प्रकारामुळे डॉक्टरांची चांगलीच बोबडी वळली. पण, त्यामुळे बिच्चाऱ्या त्या कैद्याला पुन्हा जिवदान मिळाले. अन्यथा....
मीडिया रिपोर्टनुसार, गोंजालो मोंटोया जिमेनेज़ (वय-२९ वर्षे) असे या कैद्याचे नाव आहे. नेहमीच्या वेळी सकाळी कारागृहाचा भोंगा झाला तेव्हा गोंजालोने डोळे उघडले नाहीत. तसेच, त्याला अनेकदा आवाज देऊन त्याच्या शरीराला धक्के मालले तरी त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याला मृत घोषीत केले. त्याच्या कुटुंबियांनाही तसे कळविण्यात आले. अखेर कायदेशीर बाब म्हणून गोंजालोच्या शरीराचे वेगवेगळ्या ३ डॉक्टरांनी परिक्षण केले. पण, तीनही डॉक्टरांच्या परिक्षणामध्ये गोंजालो जीवंत असण्याचे कोणतेही लक्षण आढळले नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार गोंजालोचा तो कथीत मृतदेह शवविच्छेदनासाठी संबंधीत डॉक्टरांच्या टेबलवर आला. मात्र, तेथे अचानक त्याच्या नशीबाने साथ दिली असावी. गोंजालोचे शरीर चक्क हालचाल करू लागले. ज्यामुळे डॉक्टरांना केवळ घामच फुटला नाही. तर, त्यांची बोबडीच वळली. अर्थात त्यामुळे बिच्चाऱ्या गोंजालोचे प्राण वाचले.
गोंजालोच्या कुटुंबियांनी सांगितले की, शवविच्छेदनासाटी डॉक्टरांनी त्याची बॉली खोलली होती. त्याच्या शरीरावर मार्कही करण्यात आले होते.
दरम्यान, दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्या गोंजालोच्या शरीराला फॉरेन्सीक एक्सपर्टकडे पाठवण्यात आले आहे. सध्या त्याच्या शरीरावर देखरेख करण्यात येत आहे.