नवी दिल्ली : चीन मध्ये उइगर आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या विरोधात चालवल्या जाणाऱ्या दमनकारी अभियानाविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. जो बायडेन यांनी चीनसोबत व्यापारी संबधांवर नियंत्रण आणायला सुरूवात केली आहे. ऊर्जा क्षेत्रात गरजेच्या असणाऱ्या कच्च्या चिनी मालाच्या सामानाला अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे.
सोलर पॅनलमध्ये वापरात येणारा कच्चा माल बंदी
एपी या न्यूज एजंसीने प्रसिद्ध केलेल्या माहिती नुसार अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन सरकारने सोलर पॅनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या चीनी मालावर बंदी आणली आहे. आता या प्रोडक्टला अमेरिकेच्या बाजारात विकता येणार नाही. बायडेन सरकारने गुरूवारी यासंबधी आदेश जारी केले आहेत.
कस्टम विभाग तत्काळ थांबवणार ऑर्डर
अमेरिकी सरकारच्या निर्णयानंतर चीनी मालांच्या ऑर्डर रोखण्यात येणार आहेत. इतकेच नाही तर सोलर पॅनल बनवणाऱ्या सहा कंपन्यांनाही अमेरिका ब्लॅकलिस्ट करणार आहे.
मुस्लिम अल्पसंख्यांकांचे दमण
चीनच्या जिनजयांग प्रांतात मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या विरोधात सरकार दमणकारी भूमिकेत आहे. चीनच्या या धोरणाविरोधात अनेक देश एकत्र येताना दिसत आहे. अल्पसंख्यांकांवरचे दमण थांबवण्यासाठी चीनची आर्थिक कोंडी करण्याचा या देशांचा प्रयत्न आहे. अमेरिकेची कारवाई याचाच एक भाग आहे.