कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये

तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Updated: Oct 11, 2022, 02:57 PM IST
कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये title=
SHOCKING! British man books Uber 32 lakh rupees had to be paid to travel by cab nz

Uber Wrong Bill in Britain: सोशल मीडियावर अनेकदा ॲप-आधारित कॅब सर्विसमधील चुकीच्या बिलांची (Bill) प्रकरणे समोर येतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीला 15 मिनिटे प्रवास करणे चांगलेच महागात पडले. तुम्हाला माहितेय का Uber नं प्रवास करणाऱ्या त्या व्यक्तीचे 100, 200 किंवा 500 नव्हे तर 32 लाख रुपयांचं बिल झालं. त्यानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल. (SHOCKING! British man books Uber 32 lakh rupees had to be paid to travel by cab nz)

तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने जेव्हा त्याचे बँक खाते तपासले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण Uber नं त्याला केवळ 15 मिनिटांच्या प्रवासासाठी चक्क $39,317 (सुमारे 32 लाख रुपये) रुपये घेतले.

आणखी वाचा - Relationship Tips: हेच 'ते' संकेत आहेत जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा पार्टनर करत आहे तुमचा वापर

 

 

रिपोर्टनुसार, यूकेमध्ये (UK) राहणाऱ्या 22 वर्षीय ऑलिव्हर कॅप्लाननं काही दिवसांपूर्वी ऑफिसमधून मित्रांकडे जाण्यासाठी उबेर कॅब बुक केली होती. त्यांच्या ऑफिसपासून त्या ठिकाणचे अंतर जेमतेम 15 मिनिटांचे होते. यादरम्यान तो कॅबमध्ये बसून आपल्या मित्रांकडे जाण्यासाठी निघाला. आल्यानंतर त्याने ऑनलाइन बिल भरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा त्याने क्रेडिट कार्डचे बिल तपासलं तेव्हा त्याची जाग उडाली होती.

आणखी वाचा - कमी वयातच मुलं प्रेमात? पालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

 

 

खरं तर, उबरने त्याच्या क्रेडिट कार्ड बिलावर ती कॅब बुक करण्यासाठी त्याच्याकडून 32 लाख रुपये घेतले होते. रिपोर्टनुसार, ऑलिव्हरला ब्रिटनच्या (Britain) मँचेस्टरला जायायचे होते, परंतु चुकून त्याने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मँचेस्टरला जाण्याचे ठिकाण बूक केले. यामुळेच उबरने त्याला ऑस्ट्रेलियानुसार (Australia) ३२ लाख रुपयांचे बिल केले. मात्र, ऑलिव्हरने बिल पाहून लगेच कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल केला आणि त्याची समस्या दूर झाली. बिल दुरुस्त करताना कंपनीने नंतर त्याला बरोबर बिल पाठवले जे 900 रुपये होते.