रॉकेटसोबत मंगळावर पाठवलेली कार भरकटली रस्ता

मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्पेसएक्स कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या रॉकेटसोबत पाठवलेली स्पोर्ट कार रस्ता भटकली आहे. 

Updated: Feb 8, 2018, 08:01 PM IST
रॉकेटसोबत मंगळावर पाठवलेली कार भरकटली रस्ता title=
Image Credit : news.sky.com

केप कॅनावरल : मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्पेसएक्स कंपनीकडून पाठवण्यात आलेल्या रॉकेटसोबत पाठवलेली स्पोर्ट कार रस्ता भटकली आहे. 

कार भरकटली रस्ता

इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार, फाल्कन हेवी नावाच्या रॉकेटसोबत पाठवलेली टेस्ला कारला बाहेर काढून मंगळ आणि पृथ्वीच्या मधल्या कक्षेत स्थापित व्हायचं होतं. पण रॉकेटमधून निघताना ही कार अडकली आणि आकाशात चुकीच्या रस्त्यावर गेली. 

किती मोठं आहे रॉकेट?

स्पेसएक्सकडून लॉन्च करण्यात आलेल्या फाल्कन हेवी रॉकेटचं वजन जवळपास ६३.८ टन आहे. हे वजन जवळपास स्पेस शटलच्या वजनाच्या बरोबरीत आहे. या रॉकेटमध्ये २७ मर्लिन इंजिन लावले आहेत आणि याची लांबी २३० फूट आहे. हे रॉकेट एका २३ मजली इमारतीच्या उंचीसारखं आहे. 

कशामुळे कार भरकटली रस्ता?

स्पेसएक्सचे मालक एलन मस्क म्हणाले की, ही कार आता सध्या इतर छोट्या ग्रहांजवळ आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, ही कार पुढे ढकलण्यासाठी ज्या इंधनाचा विस्फोट व्हायचा होता, तो योग्य पद्धतीने झाला नाही. त्यामुळेच ही कार ठरलेल्या मार्गाऎवजी मार्ग भरकटली आहे. कारच्या मार्गात बदल होने हे स्पेसएक्ससाठी चिंतेची बाब आहे. 

प्रायव्हेट कंपनीचं सर्वात मोठं रॉकेट

असे पहिल्यांदाच झाले आहे की, प्रायव्हेट कंपनीने कोणत्याही सरकारी मदतीशिवाय इतकं मोठं रॉकेट तयार करण्यात आलंय. जर हे यशस्वी झालं तर येणा-या काळात स्पेसएक्स एअरफोर्सच्या सॅटेलाईटला अंतराळात पोहोचवण्यास मदत करेल.