लंडन : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स त्यांच्या चॅनेलला जास्त सबस्क्रायबर आणि फॉलेअर्स मिळवण्यासाठी नवीन कल्पना आणि विचार करत राहतात. त्यांना प्रसिद्धी मिळण्यासाठी ते वाटेल ते करण्यासाठी तयार होतात. परंतु कधीकधी या पद्धतींना फटका बसतो, कधीकधी या पद्धतींमुळे ते ट्रोल होतात आणि त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. अमेरिकेतील एका यूट्यूबरच्या बाबतीतही असेच घडले. तिने स्वतःच्या मुलासोबत असा व्हिडीओ पोस्ट केला की, लोक तिच्यावरती संतापले. ज्यामुळे या महिलेवर तिचा यूट्यूब चॅनेलच डिलीट करावे लागले.
वास्तविक, ही घटना अमेरिकेतील प्रसिद्ध YouTuber जॉर्डन चेनसोबत घडली आहे. जॉर्डन अनेकदा तिच्या यूट्यूब चॅनेलद्वारे लोकांशी संपर्क साधत असे आणि नवीन व्हिडीओंद्वारे लोकांचे मनोरंजनही करत असे. 'इनसाइडर'च्या ऑनलाइन अहवालानुसार, जॉर्डन चेन अलीकडेच तिच्या कारमध्ये कुठेतरी जात होती आणि या दरम्यान तिचा नऊ वर्षांचा मुलगाही तिच्यासोबत कारमध्ये होता.
जॉर्डनने विचार केला की, या वेळेचा फायदा घेऊन व्हिडीओ बनवा आणि पोस्ट करावा.
या दरम्यान जॉर्डनने व्हिडीओ सुरू केला आणि त्यात तिच्या मुलालाही रेकॉर्ड केलं. व्हिडीओमध्ये जॉर्डन रडताना दिसत होती आणि तिने आपल्या मुलालाही रडण्यासाठी सांगितले.
परंतु तिच्या मुलाला हे सगळं करण्यात फारसा इंट्रेस्ट नव्हता, ज्यामुळे तो नाखूष होता, परंतु व्हिडीओमध्ये जॉर्डन मुलाला जबरदस्तीने खेचत असल्याचे तुम्ही उघडपणे पाहू शकता. ती तिच्या मुलाला आपल्या खांद्यावर डोके ठेवण्यास सांगत असते आणि जबरदस्तीने आपल्याकडे खेचून खांद्यावर डोकं ठेऊन रडण्यासाठी सांगत आहे.
संपूर्ण व्हिडीओ चित्रित झाल्यानंतर, जॉर्डनने हा व्हिडीओ तिच्या चॅनेलवर अपलोड केला.
हा व्हिडीओ लोकांसमोर येताच जॉर्डनवर लोक भडकले. लोक आरोप करू लागले. लोक म्हणू लागले की, जॉर्डनला तिच्या मुलाच्या माध्यमातून आपले Views आणि फॉलोअर्स वाढवू पाहात आहे. जॉर्डनच्या अनेक चाहत्यांना हे आवडले नाही. त्यामुळे या व्हिडीओ संबंधीत वाद वाढत असल्याचे पाहून जॉर्डनने हा व्हिडीओ आपल्या चॅनलवरुन काढला, परंतु त्या व्हिडाओच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.
this is so DISTURBING what is wrong with mom vloggers omfg pic.twitter.com/krUjM5Sfit
— elle woods 21 (@artangeIII) September 8, 2021
व्हायरल व्हिडीओवरुन जॉर्डनलाही टॅग आणि ट्रोल करण्यात येते होते, ज्यामुळे अखेरीस जॉर्डनला तिचे यूट्यूब चॅनेल हटवावे लागले. जॉर्डनने तिचे यूट्यूब चॅनेल काही काळासाठी बंद केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्डनने 'वी आर हार्टब्रोकन' नावाचा हा व्हिडीओ अपलोड केला आहे.
खरेतर तिचा कुत्रा आजारी पडल्यानंतर ती त्या कुत्र्यासाठी हा व्हिडीओ बनवत असल्याचे सांगितले जात आहे आणि यामध्ये ती आपल्या मुलाला रडवण्याचा अभिनय करण्यासाठी सांगत आहे आणि त्याला रडण्यासाठी जबरदस्ती करत होती. जे लोकांनी पसंत केलं नाही.