वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र जाता-जाता ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या एका निर्णयामुळं त्यांनी भारताशी असलेली मैत्री राखली आहे. शिवाय पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने 'नाटो'मध्ये सहभागी असलेल्या तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयम एर्डोगान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे तुर्कीच्या अधिकारांवर करण्यात आलेला हल्ला असल्याचं एर्डोगान यांनी म्हटलं आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी रशियाकडून S-400 एयर डिफेंस सिस्टम खरेदी केल्यामुळे अमेरिकेने तुर्कीवर बंदी घातली. सोबतच त्यांनी इतर देशांना देखील इशारा दिला. पण जो बायडेन पदावर आल्यानंतर ते पुढे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
भारताने देखील 2018 मध्ये रशियाकडून S-400 एयर डिफेंस सिस्टमचे 5 यूनिट 5.43 बिलियन अमेरिकी डॉलरला खरेदी करण्यासाठी करार केला होता. भारताने अमेरिकेचा दबावात न येता हा सौदा केला होता. यानंतर मोदी सरकारने अमेरिका सरकार सोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवत सौदा कायम ठेवला. ट्रम्प यांनी मात्र जाता-जात रशियासोबत करार केल्याने तुर्कीवर बंदी घातली.
काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कीने पाकिस्तानच्या बाजुने मत मांडलं होतं. यानंतर भारताने तुर्कीला इशारा दिला होता. यामुळे संबंधावर आणि व्यापारावर परिणाम होईल असा इशारा भारताने दिला होता. अमेरिकेने याआधी देखील भारताला पाठिंबा दिला आहे. पण यामुळे पाकिस्तानला वेळावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर झटका लागला आहे.