मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले आहेत. ट्रम्प यांचा भारत दौरा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या केमिस्ट्रीची ही सध्या चर्चा आहे. पण यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आलेल्या त्यांची मुलगी इवांका ट्रम्प या देखील चर्चेत आहे. इवांका ट्रम्प या आज एक यशस्वी महिला उद्योजक आहेत. पण इवांका ट्रम्प यांच्यावर त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प एका निर्णयावर नाराज होते असं म्हटलं जातं.
इवाकां ट्रम्प यांनी जेरेड कुशनर यांच्यासोबत विवाह केला. त्यासाठी त्यांना धर्म देखील बदलावा लागला. इवांका यांच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. 'लग्नासाठी माझ्या मुलीला धर्म बदलण्याची काय गरज आहे.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे. इवांका यांचे पती जेरेड कुशनर यहूदी आहेत. दोघांचा विवाह 2009 मध्ये झाला होता. इवांका यांना 3 मुलं आहेत.
इवांका 2017 मध्ये ही भारतात आल्या होत्या. हैदराबादमध्ये झालेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप समिटमध्ये त्यांचा सहभाग होता. दुसऱ्यांदा भारतात येताना छान वाटत असल्याचं ट्विट करत त्यांनी म्हटलं होतं.
इवांका यांनी 2005 मध्ये फॅमिली बिढनेस ज्वॉईन केलं. ट्रंप ऑर्गेनायजेशनच्या डेव्हलपमेंट आणि एक्विजीशन विभागाच्या त्या एग्जीक्यूटीव्ह व्हाईस प्रेसिडंट होत्या. 2007 मध्ये डायनेमिक डायमंड कॉर्पसोबत त्यांनी भागीदारी केली. डिसेंबर 2012 मध्ये इवांका यांना 100 Women in Hedge Funds ने आपल्या बोर्डावर सहभागी करुन घेतलं.