मुंबई : दोन लग्न केल्यानंतर सरकार स्वतःहून पुरूषांना मदत करतय असं तुम्ही कधी ऐकलयं का?
सहाजिकच पहिल्यांदा वाचल्यानंतर अनेकांना हा केवळ विनोद वाटला असेल पण हे सत्य आहे. युएईमध्ये दुसर्यांदा लग्न करणार्या पुरूषाला सरकार मदत करत आहे.
जर युएईमध्ये एखाद्या पुरूषाने दुसर्यांदा लग्न केल्यास त्याला हाऊसिंग अलाऊंस दिला जाईल अशी घोषणा डॉ. अब्दुल्ला बेलहैफ अल नुईमी या मंत्र्याने केला आहे. डॉ. अब्दुल्ला हे विकासमंत्री आहेत. शेख झायद हाऊसिंग प्रोग्राम अंतर्गत संबंधित व्यक्तीला हाऊसिंग अलाऊंस मिळणार आहे.
यूएअईमध्ये अविवाहीत मुलींची संख्या कमी करण्यासाठी सरकारने नवी उपाय योजना केली आहे. पहिल्या पत्नीप्रमाणेच दुसर्या पत्नीचीही राहण्याची योग्य सोय व्हावी याकरिता अशाप्रकारे मदत केली जाणार आहे.
एक पत्नी असणार्यांमध्येही पुरूषाला भत्ता मिळतो. मात्र त्या तुलनेत दोन पत्नी करणार्यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.