US Election 2020: अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर अखेर ट्रम्प कुटुंबियांनी मास्क घातला

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया ट्रम्प यांना झाली होती कोरोनाची लागण

Updated: Oct 24, 2020, 09:35 AM IST
US Election 2020: अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर अखेर ट्रम्प कुटुंबियांनी मास्क घातला title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच कोरोना महामारीचा धोका कमी लेखला होता आणि यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. नंतर ते स्वत: कोरोना संक्रमित झाले. असे असूनही, त्यांच्या कुटुंबियांनी मास्क लावण्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या शेवटच्या अध्यक्षीय चर्चेच्या वेळी, त्यांचे संपूर्ण कुटुंब मास्क घातलेले दिसले. अधिकाऱ्यांनी आधीच सूचना दिल्या होत्या की, जर त्यांनी मास्क घातला नाही, किंवा मास्क काढला तर त्यांना चर्चेच्या ठिकाणाहून बाहेर केलं जाईल.

शेवटच्या अध्यक्षीय चर्चेच्या वेळी अधिकाऱ्यांच्या दबावामुळे हे कुटुंब संपूर्ण वेळ मास्क घालून बसले होते. फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, मुलगी इवांका आणि टिफिनी, मुलगा एरिक देखील मास्क लावून या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या कपड्याच्या हिशोबाने यांनी मास्क घातले होते.

Trump family

अध्यक्षपदाच्या चर्चेच्या पहिल्या फेरीनंतरच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनाही रुग्णालयात बराच वेळ घालवावा लागला.