Viral Video : सध्याच्या धकाधकीच्या जीवनातही अनेकजण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी योगा किंवा जीमला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी फिटनेस फ्रिक तरुणाई जीमच्या वेडापाई जागा मिळेल तिथे जीममधली प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न करत असतात.
असाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीने रस्त्यावर केलेला स्टंट पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
या व्हिडीओमध्ये बॅकलेस मिनी ड्रेस घातलेली एक मुलगी रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून जाताना दिसत आहे. पण एवढ्या रात्री निर्जन रस्त्यावर ती काय करणार असेल याचा अंदाजही कुणाला येत नाही.
त्यानंतर ती मुलगी रस्त्याच्या खांबावर चढू लागते. या व्हिडीओतील मुलीची चपळता पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ही मुलगी खांबावर चढून सुरुवातीला पुलअप्स काढते आणि त्यानंतर एरोबिक्स करू लागते. तिच्या शरीराची लवचिकता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
अशा पद्धतीने एरोबिक्स करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला खूप सराव करावा लागतो. त्यामुळे ही तरुणी यामध्ये निष्णात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
Amazing Skills and Strength! pic.twitter.com/AG9w7y1EQA
— Next Level Skills (@SkillsLevel) August 20, 2022
ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 58 सेकंदांचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो तो लाइकही केला आहे. अनेक जण कमेंट सेक्शनमध्ये लोक मुलीचे कौतुक करत आहेत.