इंडोनेशिया : देशात तुळशीच्या लग्नानंतर लग्न मुहूर्ताला (wedding ceremony) सूरूवात होणार आहे. या तुळशीच्या लग्नानंतर एकामागो माग एक लग्न सोहळे पार पडत असतात. या लग्न सोहळ्याची (wedding) चर्चा असताना आता एक अशी घटना समोर आली आहे, ही घटना एकूण तुम्ही अवाक होणार आहेत. कारण या घटनेत एक व्यक्ती 88 व्या वेळी बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची एकच चर्चा रंगली आहे.
आतापर्यत तुम्ही एखाद्याने दोन वेळा, तीन वेळा अथवा 7 वेळा लग्न (wedding)केल्याची घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र ही घटना खुपच वेगळी आहेत.कारण या घटनेत एका व्यक्तीने 87 वेळा लग्न केले आहे.आणि तो आता 88 व्या वेळी लग्न करण्याची तयारी करतोय. या त्याच्या लग्नाची चर्चा आता सर्वदुर पसरली आहे.
इंडोनेशियामधली ही घटना आहे. इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतातील माझालेंगका येथील 61 वर्षीय कान हे 88 व्यांदा लग्नबंधनात (wedding ceremony) अडकणार आहेत. कान हे त्याच्या माजी पत्नीशी लग्न करणार आहे. रेकॉर्डब्रेक विवाहांमुळे त्याला 'प्लेबॉय किंग' असे टोपणनाव देखील मिळाले आहे.
61 वर्षीय कान हे व्यवसायाने शेतकरी आहेत. कानने सांगितले की, तो माजी पत्नीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकला नाही. तसेच ते वेगळे होऊन बराच काळ लोटला असला तरी त्यांच्यातील प्रेम अजूनही कायम आहे. वराने हे देखील उघड केले की यापूर्वी त्याचे त्या महिलेशी लग्न महिनाभर चालले होते.
शेतकऱ्याच्या लग्नाचा (wedding ceremony) इतिहास म्हटला तर त्याच वयाच्या 14 व्या वर्षी पहिल लग्न झालं होते. त्याने किशोरवयात प्रथमच लग्न केले, त्याची पहिली वधू त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. या पहिल्या लग्नाबाबत कानने सांगितले की, त्यांचे लग्न फक्त दोन वर्षे टिकले आणि तिच्या पतीने तिच्या खराब वृत्तीचे कारण देत घटस्फोट घेतला होता.
दरम्यान कानला त्याच्या पहिल्या लग्नामुळे स्त्रियांवर प्रेम करण्याची प्रेरणा मिळाली होती. कानने कबूल केले की तो खुप रागीट आणि चिडलेला असतो. तो पुढे म्हणाला, "पण मला असे काम करायचे नाही जे महिलांसाठी चांगले नाही. मी त्यांच्या भावनांशी खेळण्यास नकार देतो. अनैतिक गोष्टी करण्यापेक्षा लग्न करणे चांगले,असेही तो म्हणतोय.
आतापर्यंत कानने 87 लग्न (wedding ceremony) केले आहेत, आता तो 88 व्या लग्नाची तयारी करत आहे. या त्याच्या लग्नाची सर्वंत्र चर्चा रंगली आहे.