तरुणीने अंगावरील दागिने काढून रस्त्यावर ठेवले, एकानेही लावला नाही हात; 'या' शहराचा प्रामाणिकपणा पाहून आश्चर्यचकित

तरुणीने गजबजलेल्या रस्त्यावर लाखो रुपयांचे दागिने ठेवून दिले. यानंतर तिने अर्धा तास लांब उभं राहून निरीक्षण केलं. पण एकाही व्यक्तीने त्या दागिन्यांना हात लावला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 4, 2024, 09:53 PM IST
तरुणीने अंगावरील दागिने काढून रस्त्यावर ठेवले, एकानेही लावला नाही हात; 'या' शहराचा प्रामाणिकपणा पाहून आश्चर्यचकित title=

रस्त्यावर तासभर दागिने ठेवल्यानंतरही कोणीही त्यांना हात लावला नाही तर किती आश्चर्य वाटेल. मुळात हे शक्य आहे का येथूनच याची सुरुवात होईल. पण खरंच असं झालं आहे. एका तरुणीने रस्त्यावर आपल्या गाडीवर अंगावरील सर्व दागिने काढून ठेवले होते. पण अर्धा तास झाला तरी तेथून जाणाऱ्या एकाही व्यक्तीने त्या दागिन्यांना हात लावला नाही. सोशल एक्स्पेरिमेंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीला तरुणी आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून गाडीच्या बोनेटवर ठेवताना दिसत आहे. यावेळी तिने जवळच्या दुकानात छुपा कॅमेरा लावला होता. दागिने ठेवल्यानंतर ती शेजारी असणाऱ्या दुकानात जाऊन थांबली होती. अर्ध्या तासात गाडीसमोरुन अनेक लोक केली. सर्वांची नजर दागिन्यांवर पडली. पम एकाही व्यक्तीने त्या दागिन्यांना हातही लावला नाही. एका महिलेने तर याउलट खाली पडलेला एक दागिना उचलून पुन्हा गाडीच्या बोनेटवर ठेवला. हे पाहिल्यानंतर तरुणी आश्चर्यचकित झाली. 

दुबई सर्वात सुरक्षित देश

हा व्हिडीओ दुबईत शूट करण्यात आला आहे. दुबईची गणना जगातील सर्वात सुरक्षित देशांमध्ये केली जाते. क्राइम अँण्ड सेफ्टी इंडेक्सनुसार, दुबाईच नाव जगातील पाच सर्वात सुरक्षित शहरांपैकी आहे. दुबईतील गुन्हेगारीचा आकडा फार कमी आहे. यामुळे हे शहरातील सुरक्षेची चर्चा जगभरात होत असते. या व्हायरल व्हिडीओने हा दावा खरा असल्याचं सिद्ध केलं आहे. 

नेटकऱ्यांनी काय कमेंट्स केल्या आहेत?

Instagram वर leylafshonkar या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 80 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. याशिवाय व्हिडीओवर अनेक लोकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 

एका युजरने लिहिलं आहे की, "तेथील कठोर कायद्याचा हा परिणाम आहे. जर कोणी दागिन्यांना हात लावला असता तर त्याचे हात कापले असते". तर एकाने उपहासात्मकपणे म्हटलं आहे की, "भारतात त्यामानाने बरं आहे. जर हे दागिने भारतात ठेवले असते तर एखाद्या गरजूपर्यंत पोहोचले असते आणि त्याचं आयुष्य सहज झालं असतं". तर एकाने मला भारतातही हा प्रयोग करुन पाहण्याची इच्छा आहे असं म्हटलं आहे.