Restaurant Lets You Catch Your Own Fish To Cook : सुरमई फ्राय (Surmai Fry), पापलेट फ्राय (Paplet fry) ...म्हटलं की अस्सल मस्त्यप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं..तुमच्याही सुटलं ना...मग तुम्ही अगदी दर्दी मासे खवय्ये आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला ताजे मासे खायचे असतील तर आम्ही तुम्हाला एक भन्नाट जागा दाखविणार आहोत. ही जागा म्हणजे अस्सल मस्त्यप्रेमींसाठी (Fish lover) जणू स्वर्गच...ही जागा पाहून तुम्ही पण नक्कीच इथे जाण्याचा बेत आखाल. अच्छा आम्हाला सांगा तुम्ही कधी कुठल्या रेस्तराँमध्ये सोबत ताजे मासे किंवा चिकन (Fresh fish or chicken) घेऊन गेले आहात आणि मग तेथील कूक तुम्हाला मस्त असे जीभेचे चोचले पुरवणारे पदार्थ बनवून देतात...काय असं पण असतं...आम्ही नाही केलं असं...हो ना. पण सोशल मीडियावर एक भन्नाट रेस्तराँचा व्हिडीओ व्हायरल (restaurant video viral) होतो आहे तो पाहून तुम्ही वेडच व्हाल.
वाचा - Black Thread : 'या' राशीच्या लोकांसाठी हात-पायांमध्ये काळा धागा बांधणे घातक
एक रेस्तराँ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे जिथे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मालकाने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. जर तुम्हाला मस्त ताजेतवाने मासे खायचे असतील तर या रेस्तराँमध्ये तुम्हाला ते तलावातून पकडावे लागतील. या रेस्तराँमध्ये (Restaurant) कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. ज्यात विविध मासे आहेत. या तलावात मासे पकडण्यासाठी तुम्हाला बोट दिली जाते. शिवाय जेव्हा तुम्ही मासे पकडता तर रेस्तराँमध्ये आनंद उत्सव साजरा केला जातो. आता तुम्ही जे मासे पकडले आहेत, त्याचे स्वादिष्ट पदार्थ या रेस्तराँमधील कूक तुम्हाला बनवून देतात. (Viral Video Restaurant Lets You Catch Your Own Fish To Cook nmp)
तर हे भन्नाट रेस्तराँ जपानमधील (Japan) टोकीयोमध्ये (Tokyo) आहेत. या अनोख्या रेस्तराँचा व्हिडीओ एका ब्लॉगरनं (Blogger) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअक केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 445,680 likes मिळाले आहेत. जर तुम्ही कधी जपान फिरायला जाण्याचा प्लन केला तर या रेस्तराँमध्ये नक्की जा.