शार्कचा व्यक्तीवर हल्ला, असा वाचला जीव; पाहा थरारक व्हिडीओ

शार्कसोबत खेळणं पडलं महागात, त्याने क्षणात हल्ला केला आणि... पाहा थरारक व्हिडीओ

Updated: Jul 22, 2022, 06:33 PM IST
शार्कचा व्यक्तीवर हल्ला, असा वाचला जीव; पाहा थरारक व्हिडीओ  title=

Viral video| सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी आपल्याला खळखळून हसवतात तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणतात. कधी आपल्याला 15 सेकंदात महत्त्वाचा संदेश देऊन जातात तर कधी आपलं नकळत मनोरंजन करतात. सध्या एका व्हिडीओची तुफान चर्चा आहे. 

एक तरुण बोटीतून जात असताना शार्क माशाशी पंगा घेत असल्याचं दिसत आहे. शार्क मासा खतरनाक असतो हे माहीत असूनही हा तरुण त्याच्यासोबत खेळायला जातो. हाच स्टंट त्याच्या जीवावर बेतता बेतता थोडक्यात निभावतं. 

11 सेकंदाचा हा व्हिडीओ अत्यंत थरकाप उडवणारा आहे. हा तरुण शार्कला त्रास देत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शार्क त्याच्या हाताला चावतो. शार्कच्या डबड्यातून हा व्यक्ती आपला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. व्यक्तीचा हात रक्तबंबाळ होतो. 

या व्हिडीओला 3 हजारहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. तर 33 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. पण अशी मस्ती अंगाशी येऊ शकते हे या व्हिडीओमधून दिसत आहे. 

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा