Santa Claus : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जगभरात लोक नाताळ हा सण साजरा करतात. अनेक लोकांचा या सणाला उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. दरवर्षी ख्रिसमस म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो पांढरी दाढी आणि पांढरे केस आणि हा सांता लाल रंगाचे ड्रेस परिधान करतो. हातात मोठी बॅग आणि त्या बॅगेत खूप सारे गिफ्ट्स.... 25 डिसेंबरला सांताक्लॉज लहान मुलांना भेटवस्तू आणि चॉकलेट देतो. लहान मुलं या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. हल्ली भेटवस्तू देण्याच्या प्रथेला जोर आला आहे. सध्या ऑफिसमध्ये ही भेटवस्तू देण्याच्या कार्यक्रमाला जोर धरला आहे. सिक्रेट सांता या नावाने त्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का सांताक्लॉज कोण आहे आणि कधीपासून मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. आज आम्ही तुम्हाला त्याविषयी सांगणार आहोत.
पांढऱ्या केसांचा, पांढऱ्या दाढीचा... लाल कपडे परिधान करणाऱ्या सांताक्लॉजचं खरं नाव सेंट निकोलस. सेंट निकोलस यांचा जन्म तिसऱ्या शतकात त्यांचा जन्म तुर्किस्तानमधील मायरा नावाच्या शहरात झाला होता. या संत निकोलस यांनाच खरा सांता म्हणतात. इतिहासकारांच्या मते, त्यांचा जन्म प्रभु येशूच्या मृत्यूनंतर झाला होता. असे मानले जाते की ते डोंगरावरील बर्फाळ ठिकाणी राहत होते. नाताळ सणाला सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू देत असत. ते लहान असताना अनाथ होते. त्यानंतर, येशूवर त्याचा विश्वास वाढत गेला आणि त्यांनी स्वतःचे पालक म्हणून येशूचा स्वीकार केला. पुढे संत निकोलस मोठा झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा धर्मगुरू बनला. मुख्यतः सांताक्लॉज आणि प्रभु येशू यांच्यात काही संबंध नाही परंतु सांताक्लॉजला ख्रिसमसचे मुख्य महत्त्व आहे.
सेंट निकोलस यांच्या उदारपणाची एक अतिशय प्रसिद्ध कहाणी आहे. निकोलस यांना मदत करण्याचा छंद होता. ते कायमच गरिबांना मदत करतं. एका त्यांनी एका गरीब माणसाला मदत केली होती. ज्याच्याकडे त्याच्या तीन मुलींचे लग्न करण्यास पैसे नव्हते. त्यावेळी, संत निकोलसने छुप्या पद्धतीने त्या तीन मुलींच्या मोज्यांमध्ये सोन्याच्या नाण्यांची पिशवी ठेवली आणि त्यांना या समस्येतून सुखरूप सोडवले. तेव्हापासून, ख्रिसमसच्या रात्री भेटवस्तू मिळण्याच्या आशेने लहान मुले घराबाहेर किंवा खिडकीत मोजे टांगतात.
सांताक्लॉजचे फिनलंडमधील रोवानेमी हे गाव आहे. हे गाव वर्षभर बर्फाने झाकलेले असते. या गावात सांताक्लॉजचे कार्यालय देखील आहे. तेथील कार्यालयातील मुख्य कर्मचारी पांढरे पोषाख परिधान करतात. आजही लोक त्यांच्या कार्यालयात पत्र पाठवतात. त्या कार्यालयात एक टीम देखील सक्रिय आहे जी पत्रे गोळा करतात आणि त्यानंतर दाढी आणि लाल ड्रेससह सांताक्लॉजच्या पोशाखात या पत्रांची उत्तरे देतात. रोव्हानिमीला येणाऱ्या पर्यटकांना येथे फोटो क्लिक करण्याची परवानगी नाही.