Israel Hamas War : सध्या इस्त्रायल आणि गाझा पट्टीतील हमासमध्ये घनघोर युद्धाला सुरूवात झालीये. कोणीही माघास घेण्यास तयार नाही. आणखी शक्तीनिशी दोन्ही देशांनी आक्रमक हल्ले सुरू केले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून सर्व देश आपापल्या नागरिकांना इस्रायलमधून (Israel News) बाहेर काढण्यात व्यस्त आहेत, तर भारताने देखील 'ऑपरेशन अजय'च्या (Operation Ajay) माध्यमातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कंबर कसलीये. युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील भारतीय दूतावासाला सतर्क करण्यात आलंय. तर इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेची ग्वाही देतानाच त्यांच्या सतत संपर्कात राहण्यास सांगितलंय. त्यामुळे भारतीयांची चिंता आता मिटली आहे. मात्र, एवलुश्या इस्त्रायलमध्ये भारतीय का जातात? असा सवाल सर्वांना पडला असेल. मात्र, तुम्हाला माहितीये का? की इस्त्रायलमध्ये एका जॉबसाठी (Indian caregiver job in Israel) भारतीयांची खूप डिमांड आहे.
इस्त्रायलमध्ये आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ अधिक असतात. त्यामुळे भारतीयांचं इस्त्रायलमध्ये नोकरी करण्याचा कल देखील आहे. अशातच काही भारतीय इस्त्रायलमध्ये काळजीवाहू (Indian caregiver) व्यक्तीची नोकरी देखील करतात. म्हणजेच... श्रीमंत देशात वृद्धांची काळजी घेण्यासाठी कमी वेळ असतो. त्यांची काळजी घेण्यासाठी नोकरभरती केली जाते. इस्त्रायलमध्ये अनेकांना आपल्या आईवडिलांची काळजी घेणं जमत नाही. त्यामुळे ते व्यावसायिक काळजीवाहू लोक शोधतात. वृद्धांच्या खाण्यापिण्यापासून त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांची निवड केली जाते. इस्त्रायलमध्ये ही संकल्पना लोकप्रिय असून भारतीयांना तिथे मान आणि प्रतिष्ठा देखील असते.
इस्त्रायलमध्ये वृद्धांची लोकसंख्या झपाट्याने वाढली. 1950 पासून 65 वर्षांपेक्षा जास्त लोकसंख्या अधिक असल्याने युवकांवर अधिक भर आला. आता वृद्धांची संध्या गेल्या 50 वर्षात 18 पट झाली आहे. त्यामुळे पगार देखील भरभक्कम मिळतो. इस्त्रायलमध्ये एका काळजीवाहू नोकरदाराला 1.25 लाख ते 3 लाख रुपये पगार मिळतो. म्हणजे कामाच्या तासाला किमान 900 रुपये मिळतात. याशिवाय राहण्याचा आणि जेवणाचा खर्च देखील त्यांच्याकडून केला जातो. वैद्यकीय सुविधा आणि कायदेशीर प्रक्रिया देखील अवलंबली जाते.
दरम्यान, इस्त्रायमधील जिकीनचा समुद्रकिनारा, जिथे विकेंडचा आनंद लुटण्यासाठी, मजामस्तीसाठी इस्त्रायली नागरिक जमायचे. मात्र अश्कलोन शहरातील जिकीनच्या या समुद्रकिनाऱ्यावर आता स्मशान शांतता पसरलीये. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या क्रूर दहशतवाद्यांनी अश्कलोन शहरात याच समुद्रामार्गे प्रवेश केला आणि नरसंहार घडवला. समुद्रामार्गे दहशतवादी घुसलेच कसे याबाबत इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादवर अनेक सवाल उपस्थित होतायत.