Guinness World Record: जन्मताच डॉक्टर वाटलं, जगणार नाही; वयाच्या 92 व्या वर्षी बेंडकुळ्या दाखिवतंय ‘म्हतारं’!

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने 92 वर्षीय बॉडीबिल्डरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जिथे त्यांनी त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य उघड केले आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 9, 2025, 05:54 PM IST
Guinness World Record: जन्मताच डॉक्टर वाटलं, जगणार नाही; वयाच्या 92 व्या वर्षी बेंडकुळ्या दाखिवतंय ‘म्हतारं’! title=

Jim Arrington : वृद्धापकाळातही आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवणाऱ्या अनेक लोकांच्या प्रेरणादायी कथा आहेत. कारण फिटनेससाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही. व्यायाम हा फक्त तरुण मुलांनीच करावा असा अनेक जणांचा गैरसमज आहे. अनेक जण वर्षानुवर्षे ते सातत्याने व्यायाम करतात. सध्या अनेक वयोगटातील लोक व्यायाम करताना दिसतात. ज्यामध्ये वृद्ध वयोगटातील लोकांचा देखील समावेश आहे. 

दरम्यान, अशातच एका 92 वर्षाच्या बॉडीबिल्डरचे नाव चर्चेत आले आहे. हा वृद्ध व्यक्ती अमेरिकेतील आहे. ज्याचे नाव जिम एरिंगटन आहे. या व्यक्तीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे.  

जगातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डर 

वयाच्या 92 व्या वर्षी जिम एरिंगटनला त्याच्या शरीराची चमक दाखवायला आवडते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार, विक्री व्यावसायिक आणि आजोबा यांनी 2015 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी जगातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डर म्हणून प्रथम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश केला. ( याआधी 104 वर्षांचा आणि 72 वर्षांपूर्वी मिस्टर युनिव्हर्सचा किताब पटकावणारा भारतीय माणूस होता. मात्र, त्याचे निधन झाले आहे. त्याचे नाव मनोहर ऐच होते.) वयाच्या 92 व्या वर्षी देखील ते अजूनही मजबूत आहेत. 1 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेल्या जिम एरिंगटनला शाळेत खूप त्रास दिला गेला. यामुळे त्याला फिटनेस एक्टिविटी करायला प्रवृत्त केले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जन्मताच जिम एरिंगटनला वाचवण्यासाठी संघर्ष 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार, जिम एरिंगटनचा जन्म हा दीड महिने आधी झाला होता. तेव्हा त्याचे वजन 2.5 किलो होते. यावेळी त्याच्या पालकांनी जिम एरिंगटनला वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष  केला होता. त्याला अत्यंत अस्वस्थ मुलगा होता. जो नेहमी आजारी पडायचा. 1947 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्याने वजन उचलण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याच्या स्वतःच्या शब्दात, त्याला सुपरहिरो व्हायचे होते.

जिम एरिंगटन हा आठवड्यात फक्त तीन वेळा जिममध्ये जातो. दोन तास जिम करतो. मशरुम आणि इतर आरोग्यदायी पदार्थ खाऊन जिम एरिंगटन आपल्या आहाराची काळजी घेतो. तो आता पाच दशकांहून अधिक काळ बॉडीबिल्डर आहे. त्याने अनेक स्पर्धा शो जिंकले आहेत.