क्या बात हैं! जगातील असं एक राजधानीचं शहर जिथं नाहीत ट्रॅफिक लाईट्स, ना होतो ट्रॅफिक जॅम

भूतान हा जगातील एकमेव कार्बन फ्री देश आहे. कार्बन फ्री देश म्हणजे या देशात जेवढ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात इथला निसर्ग कार्बन शोषून घेतो. 

Updated: Oct 27, 2022, 07:26 PM IST
क्या बात हैं! जगातील असं एक राजधानीचं शहर जिथं नाहीत ट्रॅफिक लाईट्स, ना होतो ट्रॅफिक जॅम title=

Amazing cities : जगभरातील प्रत्येक देशात, तिथल्या मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या आहेच ( Traffic problem) . कितीही प्रतग देश असला किंवा आपण सुपरपॉवर म्हंटल तरी तिथेही ट्रॅफिक जॅम ही समस्या आहेच. न्यूयॉर्क, लंडन, शांघाय, नवी दिल्ली, मुंबई, सिडनी या सर्व शहरांमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या नेहमीची आहे. ज्या पद्धतीने शहरांमध्ये लोकसंख्या वाढत जातेय, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या ही वाढतेय ( High poppulation and traffic problem). अशात कधी नैसर्गिक आपत्ती किंवा तर कधी मानवी आपत्ती यामुळे ट्रॅफिक लाईट्स बंद पडतात आणि नंतर लागतात वाहनांच्या मोठाल्या रांगा ( Huge traffic ques) . मात्र आज आम्ही तुम्हाला एका असं एक शहर सांगणार आहोत, जिथे ना ट्रॅफिक लाईट्स आहेत, ना लागतो ट्रॅफिक जॅम. दक्षिण पूर्व आशियातील, हिमालयाच्या कुशीत वसलेला हा एक अतिशय सुंदर देश आहे. या देशाच्या राजधानीचं शहर थिंपूमध्ये एकही ट्रॅफिक लाईट नाही. या देशाबाबत अशा अनेक भन्नाट गोष्टी आहेत ( Interesting fact of BHutan)   ज्यामुळे तुम्ही एकदा तरी या देशात जायलाच हवं असं नक्की म्हणाल. या देशाचं नाव आहे भूतान. 

एकही ट्रॅफिक लाईट नाही

भूतान हा जगातील एकमेव देश आहे ज्याच्या राजधानीत एकही ट्रॅफिक लाईट नाही. त्याऐवजी. ट्राफिक लाईट्सच्याऐवजी थिंपूमधील पोलिस प्रमुख नाक्यांवर किंवा चौकांवर उभे राहतात आणि थेट वाहतूक हाताळतात. एकदा इथं ट्रॅफिक लाईट सेट करण्यात आलेला. मात्र त्यानंतर त्वरीत त्याला काढून टाकण्यात आलं. स्वतः तिथल्या नागरिकांनी त्याला पसंती दिली होती. 

एकमेव कार्बन फ्री देश : 

भूतान हा जगातील एकमेव कार्बन फ्री देश आहे. कार्बन फ्री देश म्हणजे या देशात जेवढ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात इथला निसर्ग कार्बन शोषून घेतो. गेल्या काही वर्षांमध्ये भूतानमधील वृक्षतोड आणि औद्योगिक विकास हा देशासाठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतो. मात्र तरीही  या देशातील जंगलांमुळे आणि इथल्या हिरव्यागार निसर्गामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतला जातो. 

...म्हणून इथे ट्रॅफिक लाईट्स नाहीत 

या रस्त्यांवर गायी, बकऱ्या मोठ्या टोळक्यांनी रस्त्यांवरून फिरताना पहायला मिळतात. भूतानमध्ये डोंगररांगांवर गाडी चालवणं कोणत्याही ऍडव्हेंचरपेक्षा कमी नाही. केवळ एवढंच नाही तर रस्त्यावर नागरिक एकमेकांना थांबवून त्यांनाही अभिवादन करतात. मात्र भूतानमधील नागरिक अत्यंत सावधपणे गाड्या चालवतात, म्हणून इथे ट्राफिक लाईट्सची गरज भासत नाही असं बोललं जातं. 

भूतानमध्ये होत नाही प्लॅस्टिकचा वापर 

भूतान या देशात 1999 मध्ये सर्वात आधी प्लास्टिक पिशवी बंदी लागू करण्यात आली. त्यानंतर 2005 आणि 2009 मध्ये पुन्हा याची अंमलबजावणी करण्यात अली. मात्र पर्यायी पर्यायांअभावी तो हा प्रयत्न अपयशी ठरला. आता भूतानमध्ये कचऱ्याचं  व्यवस्थापन तातडीने करण्याची गरज असल्याने 2019 मध्ये पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी करण्यात आली. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात याबाबतची जनजागृती सुरु करण्यात आलेली आहे. यासाठी होममेड आणि नैसर्गिक गोष्टींपासून तयार कॅरी बॅग्स वापरण्याबाबत संबोधन केलं जातंय. 

Bhutan is the only country in the world that doesn't have a single traffic light in its capital city. Instead, policemen in Thimphu stand at major intersections and direct traffic. Supposedly a set was installed, and then quickly removed, because the Bhutanese preferred the policemen.