दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

धक्कादायक,  चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

धक्कादायक, चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ टायोगोंग ‘ ही आज रविवार दि.  १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.

12 वर्ष जुना नियम मोदी सरकारने बदलला, आता होणार 40 हजार रुपयाचे फायदे

12 वर्ष जुना नियम मोदी सरकारने बदलला, आता होणार 40 हजार रुपयाचे फायदे

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटच्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी बदल केले नसले तरीही एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांची स्टँटर्ड डिडक्शनची घोषणा केली आहे. 12 वर्ष जुनी टॅक्स व्यवस्था 1 एप्रिल 2018 पासून लागू केली आहे. आता 15 हजार रुपयांची मेडिकल रीइंबर्समेंट सुविधा आता संपणार आहे. 

अमेय आणि निपुण दिसणार हिंदी सिनेमांत

अमेय आणि निपुण दिसणार हिंदी सिनेमांत

 मराठीतील लोकप्रिय जोडी अमेय आणि निपुण आता लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूडमंडळी मराठी सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणून दिसतात अगदी त्याप्रमाणे मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये देखील दिसणार आहे. आता ही मराठीतील चर्चेतील जोडी हिंदी सिनेमांत दिसणार आहे.  या सिनेमाचं नाव आहे 'हाय जॅक' . 'आम्ही पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटासाठी एकत्र काम करतोय' असं अमेयनं याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं आहे. 

धक्कादायक : डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी कापलेला पाय ठेवला दोन्ही पायांमध्ये

धक्कादायक : डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी कापलेला पाय ठेवला दोन्ही पायांमध्ये

काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी झांसीमध्ये पाय तुटलेल्या रूग्णाचा पाय त्याला उशी म्हणून डोक्या खाली ठेवायला दिला. या घटनेबाबत सगळ्याच स्तरातून विरोध करण्यात आला. आता असाच एक प्रकार सुल्तानपुरमध्ये घडला आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रेल्वे अपघातात पाय तुटलेल्या तरूणावर उपचार करण्याऐवजी कापला गेलेला पाय दोन्ही पायांच्यामध्ये ठेवून दिला. 

डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये नटसम्राटच्या डायलॉग्सवर आधारित दमदार परफॉर्मन्स

डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये नटसम्राटच्या डायलॉग्सवर आधारित दमदार परफॉर्मन्स

झी युवा नेहमीच फ्रेश आणि उत्कृष्ट कॉन्टेन्टने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले आहे. डान्स महाराष्ट्र डान्स या डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. बहारदार परफॉर्मन्सेस आणि सर्वोत्कृष्ट डान्स फॉर्म्सचा आनंद प्रेक्षक या रीऍलिटी शोच्या माध्यमातून लुटतात. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे चे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत.

सुव्रतच्या या व्हिडिओने केली नेटीझन्सची 'शिकार'

सुव्रतच्या या व्हिडिओने केली नेटीझन्सची 'शिकार'

'दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला.  आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगवेगळी बाजू मांडणारा सुव्रत जोशी. आता हाच शांत, संयमी तर कॉमेडी भूमिका साकारणार सुव्रत हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शिकारी या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.

दररोज प्या 1 कप उंटांचे दूध, होईल हा फायदा

दररोज प्या 1 कप उंटांचे दूध, होईल हा फायदा

आपल्या गाईच्या दुधाचे फायदे ऐकले असतीलच पण उंटाच्या दुधाचे फायदे आपण फारच कमी जाणतो. पण उंटाच्या दुधाचे फायदे भरपूर आहेत. त्याचा शरिरावर जास्त चांगला परिणाम होत असतो. तसेच उंटाच्या दुधामुळे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जर कुणाला बुद्धीची समस्या असेल तर उंटाच्या दुधाचा फायदा होतो. 

डेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही

डेविड वॉर्नर 'या' गोष्टीमुळे आता कधीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होणार नाही

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी  मुख्य दोषी घोषित झालेला डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे ऑस्ट्रेलिया या राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद डेविडला कधीच मिळणार नाही. केपटाऊनमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, स्टीव स्मिथ आणि कॅमरन बेनक्राफ्टला याबाबत सर्व माहिती होती. आणि डेविड वॉर्नरनेच या पद्धतीने चेंडूच्या माध्यमातून बदल करण्याचा प्रयत्न केला. 

मायकल जॅक्शनच्या मुलीचे 'या' ग्लॅमरस मॉडेलसोबत समलैंगिक संबंध

मायकल जॅक्शनच्या मुलीचे 'या' ग्लॅमरस मॉडेलसोबत समलैंगिक संबंध

किंग ऑफ पॉप या नावाने जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकी गायक आणि डान्सर मायकल जॅक्शनची मुलगी पॅरिस जॅक्सन लेस्बियन असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटीश ग्लॅमरस मॉडेल आणि अभिनेत्री कारा डेलेवेनसोबत तिचे समलैंगिक संबंध आहेत. ही गोष्ट जॅक्शनची 19 वर्षीय मुलीने मान्य केली आहे. 

इस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट

इस्त्रो आज लाँच करणार जीसॅट - 6 ए सॅटेलाइट

अंतरिक्ष प्रौद्योगिक क्षेत्रात आज भारत जीसॅट - 6 ए चे प्रक्षेपण होणार आहे.  जीसॅट - 6 ए उच्च शक्तीचं एस बँड संचार उपग्रह आहे. प्रक्षेपण इथून जवळपास 110 किलोमीटर दूर श्रीहरिकोटाच्या अंतरिक्ष केंद्रावर प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने गुरूवारी प्रक्षेपित होणारी मिशनची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हे प्रक्षेपण 4 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे.