दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

ऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली ऋताची आवड-निवड

ऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली ऋताची आवड-निवड

 नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील गोंडस आणि सुंदर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर एक उपक्रम राबविला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाले. 

संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट  'बेधडक'

संतोष मांजरेकर दिग्दर्शित नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'बेधडक'

संवेदनशील कथानकांनी मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपट अॅक्शनपॅक्ड होणार आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला  आगामी "बेधडक" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १ जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

धक्कादायक : दिव्यांग सर्टिफिकेटसाठी नवऱ्याला पाठिवर घेऊन गेली पत्नी

धक्कादायक : दिव्यांग सर्टिफिकेटसाठी नवऱ्याला पाठिवर घेऊन गेली पत्नी

उत्तर प्रदेशमध्ये सरकारी काम कशी होतात हे पाहिलांत तर तुम्हाला धक्काच बसेल. एका महिलेला आपल्या दिव्यांग पतीसाठी सरकारी ऑफिसच्या चकरा मारत आहे. मात्र त्यासाठी तिची होणारी धडपड ही विचित्र आहे. या स्त्रिला नवऱ्याला चक्क पाठीवर उचलून घेऊन जाव लागलं आहे. 

विष्णू मनोहरांचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

विष्णू मनोहरांचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

सिनेमांचा डायलॉग व्हायरल व्हायला काही वेळ लागत नाही. आणि त्यात मराठीमधील 'नटसम्राट' या सिनेमातील डायलॉग सर्वांच्याच आवडीचे आहेत. पण याच सिनेमातील डायलॉग जर कुणा शेफच्या तोंडी असेल तर... आश्चर्यचकित झालात ना... कारण शेफ म्हटलं की उत्तम चवीचं खायला मिळणार हे नक्की पण शेफकडून उत्तम डायलॉग ही गोष्ट जरा वेगळी आहे ना. 

शुटिंगसाठी आणलेल्या जर्मन शेपर्डने  'या' अभिनेत्रीचा घेतला चावा

शुटिंगसाठी आणलेल्या जर्मन शेपर्डने 'या' अभिनेत्रीचा घेतला चावा

सिनेमाप्रमाणे आता मालिकांमध्ये देखील अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळतात. पण अॅक्शन सीन कधी कलाकाराच्या जीवावर बेतेल सांगू शकत नाही. असंच काहीस स्टार प्लस वाहिनीवरील 'इक्यावन' मालिकेत घडलं आहे. मालिकेची लीड अभिनेत्री प्राची तहलान हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. शुटिंग दरम्यान प्राचीला जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याने चावलं आहे. मात्र आपल्या कामात पॅशनेट आणि हार्डवर्किंग असलेल्या या अभिनेत्रीने इथे देखील प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे. 

बिकीनीमध्ये दिसली राज बब्बरची सून, पाहा फोटो

बिकीनीमध्ये दिसली राज बब्बरची सून, पाहा फोटो

'जाने तू या जाने ना', 'एक दिवाना था', 'धोबी घाट' सिनेमांमधून समोर आलेला राज बब्बर आणि स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बर. प्रतीक बब्बर या दिवसांत आपली होणारी पत्नी सान्या सागरसोबत वॅकेशन एन्जॉय करत आहे. हे कपल सध्या गोव्यात असून राज बब्बरची सून बिकिनीमध्ये दिसत आहे. तिथे ती प्रतीक आणि आपल्या काही मित्रांसोबत दिसत आहे. प्रतीक आणि सान्याची जानेवारी 2018 मध्ये लखनऊमध्ये साखरपुडा केला आहे. अद्याप लग्नाची तारीख मात्र नक्की झालेली नाही 

VIDEO : 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यावर अभय देओलने केली धमाल

VIDEO : 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यावर अभय देओलने केली धमाल

हरियाणातील लोकप्रिय डान्स सपना चौधरी आता बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभय देओलचा सिनेमा ''नानू की जानू" मध्ये सपना चौधरी आयटम साँग करणार असून हे गाणं मंगळवारी रिलीज झालं आहे. हे गाणं लग्न समारंभात चित्रित करण्यात आलं असून सपना चौधरी ठुमके लगावत आहे. 

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे ४४ वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर

श्री समर्थ व्यायाम मंदिराचे ४४ वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९४ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने यंदा दि. १७ ते २६ एप्रिल २०१८ या कालावधीत '४४ वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर' शिवतीर्थावर आयोजित करण्यात आले आहे. हे भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. ५ ते ८५ वर्षे या वयोगटातील सुमारे २००० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी होतात. संस्थेतील २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू या शिबिरात रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण देतात.

मधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?

मधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?

गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे.  अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

येत्या ११ मे रोजी सगळे म्हणणार ‘लग्न मुबारक’

येत्या ११ मे रोजी सगळे म्हणणार ‘लग्न मुबारक’

‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात नां? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची ते का? या प्रश्नाचं उत्तर येत्या ११ मे २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाअभय पाठक प्रॉडक्शन्स सह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटातून मिळणार आहे.