दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

'या' उत्तरामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

'या' उत्तरामुळे सोनम कपूर झाली ट्रोल

आलिया भट्टसोबत का केली सोनमची तुलना 

चंपारण सत्याग्रहावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

चंपारण सत्याग्रहावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या 'चंपारण सत्याग्रहाला' आज मंगळवारी 10 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंपारणमध्ये पोहोचले होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी भोजपुरी भाषेचा वापर केला. तसेच या भाषणात त्यांनी हमसफर एक्सप्रेसला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर त्यांनी महात्मा गांधीच्या मूर्तीला वंदन केले. मोदींनी यावेळी 20 हजार जनतेला संबोधित केले. महात्मा गांधींची बिहार ही कर्मभूमी असल्याच म्हटलं आहे. 

कशी बनली पृथ्वी? NASA च्या अंतराळ यानाने रहस्य उलघडलं

कशी बनली पृथ्वी? NASA च्या अंतराळ यानाने रहस्य उलघडलं

अमेरिकेतील अंतराळातील एजन्सी नासाने मंगळ ग्रहावर एक यान सोडणार आहे. हे यान लालग्रह असलेल्या पृथ्वीतील आतीर संरचनेवर अभ्यास करणार आहे. यावरून आपल्याला महत्वाची माहिती मिळणार आहे. या पृथ्वीवर कशाप्रकारे उंच ग्रह आणि अनेक चंद्र निर्माण होतात. नासाने सांगितल की, पहिल्यांदा हे यान अमेरिकेतील पश्चिमी भागातून सोडणार आहे. 

फॅशन डिझाइनर बापाने केला अल्पवयीन मुलींवर बलात्कार

फॅशन डिझाइनर बापाने केला अल्पवयीन मुलींवर बलात्कार

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. एका 42 वर्षीय फॅशन डिझाइनर वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. फॅशन डिझायनर असून त्याने १७ आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलींनी आईला हा प्रकार सांगताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पण हा प्रकार धक्कादायक आहे. 

VIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच

VIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलचा 'राजी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांत आलीया आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसत आहे. हा सिनेमा हटके असणार आहे यात शंका नाही. 

डान्स महाराष्ट्र डान्सच्या सेटवर स्पर्धक देणार मराठी चित्रपटांना मानवंदना

डान्स महाराष्ट्र डान्सच्या सेटवर स्पर्धक देणार मराठी चित्रपटांना मानवंदना

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील एकसे बढकर एक स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे चे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत.

ज्योतीबाच्या यात्रेत टी -20 चा जागर

ज्योतीबाच्या यात्रेत टी -20 चा जागर

टी 20 सामने सुरू होऊन अवघे 2 दिवस झाले आहेत. मात्र या टी 20 सामन्यांची जादू आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. टी 20 सामने हे क्रिकेटप्रेमींसाठी कायमच खास राहिले आहेत. मात्र आता याची जादू महाराष्ट्रात पसरलेली दिसते. ज्योतीबाच्या यात्रेत या टी 20 ची जादू पहायला मिळत आहे. 

या मदरसामध्ये शिकवली जाते संस्कृत भाषा

या मदरसामध्ये शिकवली जाते संस्कृत भाषा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच्या क्षेत्रातील गोरखपूरच्या दारूल उलूम हुसैनिया मदरसामध्ये विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषा शिकवली जाते. ANI ला विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला संस्कृत शिकायला आवडतं. आमचे शिक्षक आम्हाला खूप चांगल्याप्रकारे संस्कृत शिकवतात. तसेच आमचे पालक देखील आम्हाला मदत करतात. 

जामीनानंतर सलमान खानने केलं पहिलं ट्विट

जामीनानंतर सलमान खानने केलं पहिलं ट्विट

काळवीट शिकार प्रकरणातून जामीनावर सुटलेला सलमान खान सध्या भावूक झाला आहे. भावूक होऊन त्याने सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. जोधपूर न्यायालयाने सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. 2 दिवस कारागृहात राहिल्यानंतर आता त्याची जामीनावर सुटका झाली आहे. आता मुंबईत आल्यानंतक सलमान खानने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

अक्षय कुमारने शेअर केला हा फोटो

अक्षय कुमारने शेअर केला हा फोटो

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  अक्षय कुमारने गेल्यावर्षी जवानांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 'वीर' नावाची एक वेबपोर्टल तयार केली आहे. या वेबपोर्टलच्या अंतर्गत अक्षय कुमारने आतापर्यंत 29 करोड रुपयांची राशी जमा केली आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत फॅन्सची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोत 'भारता के वीर' ला एक वर्ष पूर्ण झालं असून 29 करोड रुपये जमा झाली आहे. या वेब पोर्टलसोबत आतापर्यंत 159 कुटूंब जोडली गेलेली आहे.