पोपट पिटेकर, मुंबई : शेतकरी आता नवनवीन आणि फायदेशीर पिकांकडे वळताना आपल्याला पाहायाला मिळतोय. कारण पारंपारिक शेतीत सातत्याने नफा हा कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता फुलांची लागवड करण्याकडे वळताना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. सरकार देखील फुलांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करते. त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात येतं.
आपण पाहतो की गुलाबाचे अनेक फायदे आहेत. तसेच त्याचा उपयोग देखील अनेक कारणासाठी केला जातो. जसं सजावट करणे, गुलाबापासून इतर अनेक पदार्थ देखील बनवले जातं. गुलाबजल, गुलाबाचा परफ्यूम, गुलकंद आणि इतर अनेक औषधेही गुलाबाच्या फुलांपासून बनवण्यात येतात. यासाठी अनेक कंपन्या शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करुन त्यांना थेट मोबदलाही देतात.
शेती करुन अनेक वर्ष नफा कमवा
शेतकरी गुलाबाची लागवड करून 9 ते 11 वर्षे सतत नफा कमवू शकतो. एका गुलाबांच्या झाडातून किमान 2 किलो फुले शेतकरी मिळवू शकतो. शेतकरी आता ग्रीनहाऊस, पॉलीहाऊस यांसारखे तंत्रज्ञानाचा वापर करुन फुलाची लागवड आता वर्षभर देखील करु शकतो.
शेतकरी हे गुलाबाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करु शकतात. परंतू तुम्ही जर चिकणमाती जमिनीत गुलाबांची लागवड केली, तर गुलाबांच्या झाडांची वाढ ही जपाट्याने होते. शेतकऱ्यांनो गुलाबाची रोपे लावताना तुम्ही लक्षात ठेवा की त्याची लागवड निचरा असलेल्या जमिनीत करावी. याशिवाय त्याची रोपे अशा ठिकाणी लावा जिथे सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात सर्व झाडांपर्यंत पोहोचेल.
झाडांना चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर झाडावरील अनेक रोग नष्ट होतात. त्यामुळे झाडांना सूर्यप्रकाश मिळणं खूप गरजेचं आहे.
गुलाबांची लागवड कशी कराल
शेतात रोपवाटिकेत लागवडीच्या पहिल्या 4 ते 6 आठवड्यात बिया पेरा. रोपवाटिकेत बियांपासून रोप तयार झाल्यानंतर ते शेतात लावा. याशिवाय शेतकरी पेन पद्धतीने देखील गुलाबाची लागवड करू शकतात. गुलाबांची लागवडीनंतर दर 7 ते 10 दिवसांनी रोपाना पाणी द्या.
किती कमवू शकता
शेतकऱ्यांनो तुम्ही गुलाबांच्या फुलांशिवाय त्याचे देठही विक्री करु शकता. कृषी तज्ज्ञांच्या मते, एक हेक्टरमध्ये 1 लाख रुपये गुंतवून तुम्ही गुलाब लागवडीतून कमीतकमी 5 ते 7 लाख रुपयांचा नफा मिळवू शकता.