Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन यंदा पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे. पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणं कठीणच दिसतंय. बीसीसीआय आणि पीसीबी दरम्यान यासंदर्भात कोणतीच चर्चा झाली नाही. टीम इंडियाने 2008 साली शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव सुरु झाला. त्यानंतर भारताने एकही पाकिस्तान दौरा केला नाही. टीम इंडियाने पाकिस्तानात येऊन खेळावे यासाठी पीसीबीने खूप प्रयत्न केले. पण भारताने आपली भूमिका बदलली नाही.2023 मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप दरम्यान टीम इंडियाने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाने पाकिस्तानात येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळावी,यासाठी पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने टीम इंडियाला विनंती केली आहे.
पाकिस्तानचा अनुभवी ऑलराऊंडर शोएब मलिकने टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.राजकारण हे खेळापासून वेगळ ठेवायला हवं, या मुद्द्यावर शोएब मलिकने जोर दिला.भारत आणि पाकिस्तानातील द्विपक्षीय मुद्द्यांना क्रिकेटसंबंधी कार्यक्रमांपासून दूर ठेवत वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवेत, असे त्याने म्हटलंय.
दोन देशांमध्ये जे मतभेद आहेत, तो वेगळा मुद्दा आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्यात आले पाहिजेत. खेळामध्ये राजकारण येता कामा नये. गेल्यावर्षी पाकिस्तानची टीम भारतात गेली होती. आता टीम इंडियासाठीदेखील ही चांगली संधी आहे.टीम इंडियात असे अनेक खेळाडू आहेत, जे पाकिस्तानात येऊन खेळले नाहीत.त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. आम्ही खूप चांगले लोक आहोत.आम्ही खूप चांगल आदरतिथ्य करतो. त्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तानात नक्की यायला हवं,असं शोएब मलिकने म्हटलंय.
टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास उत्सूक नसल्याचे वृत्त चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच समोर आले होते. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेले तणावाचे वातावरण हे त्यामागचे कारण असल्याचे म्हटले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅच श्रीलंकेच रिशेड्यूल्ड करण्याची मागणी बीसीसीआय करु शकतं. टीम इंडियाने बराच मोठा काळ पाकिस्तानसोबत मोठी सिरिज खेळली नाही. असे असले तरी आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कपमध्ये दोन्ही टीम एकमेकांसमोर आल्या आहेत. अशावेळी दोन्ही देशांमधील तणावादरम्यान कशाप्रकारे मॅच खेळवल्या जाणार? हे आयसीसीसमोर देखील एक मोठं आव्हान असणार आहे.
श्रीलंकेचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमिरा हा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडलाय. संपूर्ण दौऱ्यातून चमिरा बाहेर झाल्याने आता श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता चमिराच्या जागी कोणाची नियुक्ती होणार? यावर चर्चा सुरू आहे.टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर वानिंदू हसरंगाने कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर चरित असलंकाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. अशातच श्रीलंकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुष्मंथा चमिराला टी-20 मालिकेतून बाहेर पडलाय. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. श्रीलंकेसाठी चमिरा महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने 55 टी-ट्वेंटी सामन्यात 55 विकेट्स नावावर केले आहेत. तर आयपीएलमध्ये देखील त्याने चमक दाखवली आहे.