मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी आपले नाते जाहीर केले असून नोव्हेंबरमध्ये दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. एका मुकलाखतीत दोघांनीही लग्नाविषयी आणि एकमेकांविषयी अनेक गोष्टी खुलेपणाने शेअर केल्या.
झहीरने जेव्हा सागरिकाशी असलेल्या नात्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना सांगितलं तेव्हा त्याच्या घरच्यांनी सागरिकाच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटाची सीडी मागवली. तो चित्रपट पूर्णपणे पाहिला आणि मगच लग्नाला होकार दिला असल्याचे त्याने सांगितले. यावेळी तुम्ही कोणत्या पद्धतीने विवाहबद्ध होणार असे विचारतच झहीरने ते दोघे कोर्ट मॅरेज करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. झहीर आणि सागरिका २७ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार आहेत. लग्नापूर्वी आयोजित केलेले विविध कार्यक्रम पुणे व कोल्हापूर येथे होणार आहेत.