मुंबई : कोरोना विषाणूच्या या साथीच्या रोगात बॉलिवूडचे अनेक स्टार अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेक सेलिब्रिटी पीडित लोकांसाठी औषधे, ऑक्सिजन आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करीत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांना मदत करण्यासाठी निधी जमवण्यास सुरुवात केली आहे. या पैशातून ते कामगारांना आणि कोरोनामुळे बाधित लोकांना मदत करीत आहे. या जोडप्याने आतापर्यंत 5 कोटींचा निधी जमा केला आहे. याबद्दल त्याने सर्वांचे आभारही मानले आहेत. अनुष्का शर्माने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी संकलन केले आहे.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अनुष्का शर्माने म्हटले की, 'आम्हाला हा टप्पा गाठण्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाचे खूप आभार.' अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनुष्का शर्माचे चाहते आणि सर्व सोशल मीडिया यूजर्स तिच्या पोस्टला लाईक करत आहेत.
यापूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी मदत निधीसाठी पुढाकार घेतला आहे. दोघांनी 2 कोटींची रक्कम दान केली आहे. लोकांना पुढे येऊन या मदतनिधीसाठी देणगी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. नुकतीच या मदत निधीत 6.6 कोटींची रक्कम जमा झाली आहे.
अनुष्का शर्माने लिहिले की, 'ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे आभार. आम्ही अर्ध्यावर आहोत. आपण पुढे जायला हवे.' त्याचवेळी विराट कोहलीनेही ही पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले की, '24 तासांपेक्षा कमी कालावधीत 3.6 कोटी रक्कम जमा झाली आहे. जबरदस्त प्रतिसाद आहे. देशाच्या मदतीसाठी पैसे उभे करण्यात मदत करा, धन्यवाद.'