४०व्या वर्षी आफताब शिवदसानीने श्रीलंकेत दुस-यांदा केलं लग्न, बघा फोटो

बॉलिवूडमध्ये सध्या दुसरं लग्न करण्याचा ट्रेन्ड बघायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री ईशा देओलनेही दुस-यांदा तिचा पती भरत तख्तानीसोबत लग्न केलं.

Updated: Sep 1, 2017, 12:28 PM IST
४०व्या वर्षी आफताब शिवदसानीने श्रीलंकेत दुस-यांदा केलं लग्न, बघा फोटो title=

नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये सध्या दुसरं लग्न करण्याचा ट्रेन्ड बघायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री ईशा देओलनेही दुस-यांदा तिचा पती भरत तख्तानीसोबत लग्न केलं.

अशात या दुस-यांदा लग्न करणा-या अभिनेत्यांच्या यादीत आता आणखी एक नाव नोंदवलं गेलंय. अभिनेता आफताब शिवदसानी यांनी ४०व्या वर्षी दुस-यांदा लग्न केलंय.

आफताबने त्याच्या पत्नीसोबत श्रीलंकेत दुस-यांदा लग्न केलं. या लग्नाचे काही खास फोटोही त्याने सोशल मीडियात शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आफताबने २९ ऑगस्टला त्याची पत्नी निन दुसांझसोबत दुस-यांदा लग्न केलं. आफताबचं हे लग्न श्रीलंकेत पार पडलं. आफताबने २०१४ मध्ये निन दुसांझसोबत एका प्रायव्हेट सेरमनीमध्ये लग्न केलं होतं.

 

A post shared by Aftab Shivdasani (@aftabshivdasani) on

 

Happy third Anniversary my beloved, thank you for the best three years of my life so far.  #bliss #celestial #love #twinflame

A post shared by Aftab Shivdasani (@aftabshivdasani) on

तीन वर्षांनी पुन्हा एकदा आफताब आणि निन यांनी लग्न केलंय. निन आणि आफताब यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून झाली होती.