कियारा' आणि 'सिद्धार्थ' यांच्या नावे 50 लाख रुपयांची फसवणूक, महिलेचा सोशल मीडियावर दावा

'कियारा' आणि 'सिद्धार्थ'मुळे तब्बल 50 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप एका महिलेले सोशलमीडियावर केला आहे.   

Updated: Jul 3, 2024, 06:34 PM IST
कियारा' आणि 'सिद्धार्थ' यांच्या नावे 50 लाख रुपयांची फसवणूक, महिलेचा सोशल मीडियावर दावा title=

सिनेकलाकारांवर त्यांचे फॅन जीव ओवाळून टाकतात,याच फॅन्समुळे बऱ्याचदा सेलिब्रिटी अडचणीत येतात. अशाच एका  फॅनमुळे 'कियारा अडवाणी' आणि 'सिद्धार्थ मल्होत्रा'  अडचणीत सापडले आहेत. कियारा आणि सिद्धार्थमुळे त्यांच्या फॅनला 50 लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. सोशलमीडियावर सेलिब्रिटींचा फॅन फॉलोविंग मोठा असतो. या सेलिब्रिटींच्या नावाने सोशलमीडियावर फॅन पेज असतात. हेच फॅन पेज आता युजर्सना फसवण्याचं माध्यम झालं आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी सोशलमीडियावर कायमच चर्चेत असते. फॅन पेजच्या माध्यमातून या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सेलिब्रिटींचे हे फॅनपेज अनऑफिशियल्स असून ही यांना हजार आणि लाखोंच्या संख्येने फॉलोवर्स असतात. 

कियारा आणि सिद्घार्थच्या Fanpage Admin ने मिनू नावाच्या एका फॅनची आर्थिक फसवणूक केली आहे. मिनू नावाच्या युजरने याबाबतच्या चॅटचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले. सिद्धार्थचे फॅनपेज हँडल करणारी एडमिन अलीजा आणि हुस्ना परवीन यांनी खोट्या कहाण्या सांगून तिच्याकडून 50 लाख घेतल्याचं तिने सांगितलं. सिद्घार्थसोबत कियाराने फसवून लग्न केलं. कियारा , करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शच्या काही कलाकारांनी मिळून सिद्धार्थला फसवलं असं Admin ने मिनूला सांगितलं. पुढे ती असंही म्हणते की, 2023 पासून अलीजा आणि हुस्ना परवीन यांच्या संपर्कात आहे. अलीजाने काही एआय फोटोंचा वापर करत सांगितलं की, ती सिद्धार्थच्या पीआर टीममध्ये काम करते. कियाराने सिद्धार्थला फसंवलं आणि आता त्याच्या कुटुंबाला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

 

पैश्यांसाठी कियाराने सिद्धार्थशी लग्न केलं आणि त्याच्यावर जादू टोणा केला,असं तिने सांगितलं. सिद्धार्थ यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेला, त्याला वाचवण्यासाठी आम्ही त्याच्या फॅन्सकडे मदत मागतो आहे. तिच्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवला आणि तिने मला 50 लाखांना फसवलं. या दोघीजणी सिद्धार्थच्या पीआर टीममध्ये काम करतात, आणि लवरकच सिद्धार्थशी भेट करुन देऊ असं सांगितलं होतं. या सगळ्या घटनेबाबत तिने ट्विटरवर माहिती देत सिद्घार्थ, कियारा आणि धर्मा प्रॉडक्शनला टॅग केलं.  सिद्धार्थच्या या बोगस पीआर टीममध्ये या दोघींसोबत दीपक दुबे नावाची व्यक्ती सामील आहे. सोशलमीडियावर सेलिब्रिटींच्या फॅन्सना इमोशनल ब्लॅकमेलींग करुन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. ही पोस्ट सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.