हे कसलं वेड? पाहा तोकड्या, तंग कपड्यांमध्ये अभिनेत्री ओढतेय कचऱ्याचे डबे

तिच्या अनेक अदांनी कायमच नेटकऱ्य़ांना घायाळ करत असते. पण, त्यातच आता तिनं असं काही केलंय, पाहणारे हैराण झाले आहेत.  

Updated: Feb 15, 2022, 05:01 PM IST
हे कसलं वेड? पाहा तोकड्या, तंग कपड्यांमध्ये अभिनेत्री ओढतेय कचऱ्याचे डबे title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुख्य म्हणजे जसजसा ट्रेंड बदलतो, तसतसं हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होण्याचं प्रमाणही बदलतं. ट्रेंड फॉलो करण्यामध्ये सेलिब्रिटी मंडळी आघाडीवर असतात. 

सेलिब्रिटी मंडळींमध्ये सध्या एका विचित्र कारणामुळं चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिनेत्री अदा शर्मा. 

अदा तिच्या अनेक अदांनी कायमच नेटकऱ्य़ांना घायाळ करत असते. पण, त्यातच आता तिनं असं काही केलंय, पाहणारे हैराण झाले आहेत.

व्हॅलंटाईन्स डेच्या निमित्ताने अदाने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिच्या मादक अदा तर घायाळ करत होत्याच, पण त्यानंतर मात्र तिनं जे काही केलं ते जरा विचित्र आणि न पचणारं होतं. 

काळ्या रंगाचा मिनी ड्रेस, लाँग बूट्स, मोकळे केस आणि त्याच रुपात ती समोर आली पण, पुढे तिनं जे केलं ते अनेकांनाच किळस वाटेल असं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

कारण, इथे अदानं चक्क कचऱ्याचे डब्बे उचलत त्यासोबत फोटोशूट केलं. दोन्ही हातांमध्ये कचऱ्याच्या पिशव्या उचलून रॅम्प वॉक करतात, तशी ती चालत आली आणि अनेकांना हसू आवरणं शक्य झालं नाही. 

कचऱ्याची पिशवी ओढणं असो, उचलणं असो, किंवा एखाद्या पोल डान्स प्रमाणे डब्ब्याभोवती नाचणं असो, अदाच्या या अदा काही चाहत्यांना रुचलेल्या नाहीत हेच यातून स्पष्ट दिसत आहे.