Apruva Nemalekar on Tejashree Pradhan: सध्या 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रचंड गाजते आहे. त्यामुळे या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. या मालिकेतून सध्या महाराष्ट्रातल्या लाडक्या नायिका आपल्या समोर आल्या आहेत. शेवंता म्हणजे अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर आणि जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधान या दोघीही एकत्र या मालिकेतून समोर आल्या आहेत. यावेळी अपुर्वा नेमळेकर ही खलनायिकेच्या भुमिकेतून दिसते आहे. तर तेजश्री प्रधान ही अभिनेत्री या मालिकेची नायिका आहे. त्यामुळे या दोघींचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या मालिकेतून शुभांगी गोखले या तेजश्रीच्या आईची भुमिका करताना दिसत आहेत. सध्या ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. त्यामुळे ही मालिका चांगलीच गाजते आहे. यावेळी या मालिकेतून काम करताना तेजश्रीसोबत अनुभव नक्की कसा आहे याबद्दल एका मुलाखतीतून अपुर्वानं खुलासा केला आहे.
10 वर्षांपुर्वी 'होणार सुन मी या घरची' या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आपल्या भेटीला आली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून यावेळी तिनं या मालिकेतून कमबॅक केले आहे. याआधी ती झी मराठीवरील अग्गंबाई सासुबाई या मालिकेतून दिसली होती. या मालिकेतील त्यांची आणि निवेदिता सराफ यांची सासू सुनेची जोडी ही प्रचंड गाजली होती. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आलेला मिळाला होता. तर रात्रीस खेळ चाले या मालिकेतून अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंता समोर आली होती. तिच्या या भुमिकेला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे ही मालिका प्रचंड गाजली होती. आजही शेवंताची चर्चा होताना दिसते. यावेळी आता या दोन्ही लोकप्रिय नायिका एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
यावेळी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अपुर्वानं तेजश्रीसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, 'मी आणि तेजू गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहोत. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं तेव्हा मला कोणतीही असुरक्षितता किंवा मत्सर तिच्याबद्दल वाटला नाही. आम्ही दोघींनीही आमच्या कामातून आणि अनुभवातून आमची क्षमता सिद्ध केली आहे. तेजश्री ही तिच्या पात्राची संपूर्ण तयारी आणि अभ्यास करते हे देखील मी पाहिलं आहे. त्यामुळे मला तिच्याबरोबर काम करायला खूप छान वाटतं.'
हेही वाचा : OMG 2 ठरला शेवटचा चित्रपट, ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनानं हळहळ; शेवटची पोस्ट डोळ्यात आणले पाणी
सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.