मुंबई : काही दिवसापुर्वी अभिनेता पुष्कर जोग याने सोशल मीडिया #जोगबोलणारच हा हॅशटॅग वापरत एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला होता की, 'प्रश्न विचारणारी कर्मचारी महिला नसती तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपा करून हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील' या आशयाची मूळ पोस्ट अभिनेता पुष्कर जोगने लिहिली आहे. यानंतर हा वाद चांगलाच पेटला. यानंतर त्याने
मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी महिला कर्मचाऱ्यांनी अभिनेता पुष्कर जोगला जातीची विचारणा केल्यावरुन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यावरुन सगळीकडेच चांगलाच वाद रंगला होता. त्याच्या या विधानानंतर अभिनेता चांगलाच ट्रोल झाला. अनेक कलाकारांनाही त्याच्या विरोधात आवाज उठवला होता. किरण माने, अभिजीत केळकर, शरद पोंक्षे या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पुष्करच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्याला चांगलंच सुनावले आहे. आता अभिनेत्री मेघा घाडगेनेही त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. या सगळ्या प्रकरणात आता अभिनेत्री मेघा घाडगेने उडी घेतली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून त्याने त्याचं मत मांडलं आहे.
एक संतापजनक पोस्ट शेअर करत मेघा घाडगे यांनी लिहीलं आहे की, "#BMC #महिलासन्मान... जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार? बाई माणुस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या? तुला २ लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली, पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघुन मैत्री करणारा तू. विचारांमध्येच घाण. काय करणार? अरे मित्रा त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा. आजूबाजूला थोडी चौकशी करावी! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे. तो मी नक्कीच तुला पाठवेन. तेही नको असेल तर तुझ्याच जातीचे काही माझे मित्रमैत्रिणी आहेत. जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर.. वा घाण ...वा घाण ... वा घाण..!" लवकरच पुष्कर जोगचा मुसाफिरा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुजा सांवत या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.