मुंबई : इरोस एसटीएक्स ग्लोबल कॉरपोरेशन, (एनवाईएसई: इरोस) एक वैश्विक मनोरंजन कंपनी असून, जगभरातील थिएटर्स आणि ओटीटी डिजिटल मीडिया स्ट्रीमिंगसारख्या अनेक फॉरमेटमध्ये जगभरातील ग्राहकांसाठी चित्रपट, डिजिटल कंटेंट आणि संगीत आदींचे सह-निर्माण आणि वितरण करते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षकांसाठी विविध कथानके सादर करण्याच्या हेतूने, 40 वर्षांहूनही अधिक अशा समृद्ध वारशासोबत अभिनव आणि मनोरंजक कंटेंट सादर करण्यात ही कंपनी अग्रेसर राहिली आहे.
After 40 years of bringing diverse stories rooted in India, we at @ErosIntlPlc are now ready to take on the world.
Proud to announce the merger that will make us & @STXEnt #TRULYIndianTrulyGlobal! Unlimited entertainment coming your way soon! #ErosSTXhttps://t.co/epR4OuSOF6
— Eros Now (@ErosNow) August 10, 2020
कंपनीचा ओटीटी प्लेटफॉर्म असलेल्या इरोस नाऊकडे हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये 12,000 हून अधिक चित्रपटाचे हक्क असून 196.8 मिलियन नोंदणीकृत वापरकर्ते आणि 29.3 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. एखादया भारतीय कंपनीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी महत्वपूर्ण कामगिरी असणे, हे अभिमानास्पद आहे.
इरोस एसटीएक्स ग्लोबलने दूरदर्शी दिग्दर्शक अनुराग कश्यप, अयान मुखर्जी, इम्तियाज अली, रोहित शेट्टी आणि अन्य अद्भुत दिग्दर्शकांसोबत सहयोग करत नियमितपणे शानदार कंटेंट निर्माण करणे सुनिश्चित केले आहे. हे नमूद करण्याची आवश्यकता नाही आहे, कि प्रत्येक सुपरस्टार ज्याने इरोसच्या चित्रपटात काम केले आहे, इरोस नाउ सिनेमा प्रेमींसाठी एक उल्लेखनीय कलेक्शन बनले आहे. रॉकस्टारपासून बाजीराव मस्तानी, देवदासपासून ढिशूमपर्यंत इरोसने प्रत्येक शैलीमध्ये तयार केलेले चित्रपट गाजले आहेत. जगभरातील लाखों प्रेक्षकांसाठी ही यादी न संपणारी आहे, जे ताजा मनोरंजक कंटेंटचा आनंद घेत असतात.