अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी तीचं खासगी आयुष्य कायमच चर्चेत असतं. मग कधी मलायका आणि अर्जुनची चर्चा होते तर कधी अरबाज खानच्या लव लाइफची पण या सगळ्यात मलायका मात्र असतेच. अरबाज खानने दुसरं लग्न केलं आणि त्याच दरम्यान मलायका अरोरीची इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. महत्त्वाचं म्हणजे याचा संबंध थेट सलमान खानशी आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
मलायका अरोराने ख्रिसमस हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला. ख्रिसमस पार्टीचे फोटो मलायकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेत. यामध्ये तिने ख्रिसमसच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पण या सगळ्यापोस्टमध्ये लक्षवेधी ठरतंय ते Being Human Clothes चा टॅग.
ख्रिसमस पार्टीतील मलायकाचा लूक अतिशय बोल्ड आहे. या लूकमध्ये मलायकाने चाहत्यांच लक्षवेधलं आहे. असं असताना तिला सलमान खानच्या बिंग ह्यूमन ब्रँडमधून खास ख्रिसमस गिफ्ट मिळालं आहे. याचा खुलासा स्वतः मलायकाने आपल्या पोस्टमध्ये केलाय. सलमान खानच्या कंपनीने अलीकडेच घोषणा केली होती की 'बीइंग ह्युमन' आता महिलांसाठी पूर्णपणे नवीन कलेक्शन लॉन्च करणार आहे. ख्रिसमस आणि तिच्या वाढदिवसाचा संदर्भ देत मलायकाने सलमानच्या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटची माहितीही शेअर केली आहे.
मलायका अरोराने ख्रिसमसच्या निमित्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने तिच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानच्या 'बिइंग ह्युमन' ब्रँडने तिला किती भेटवस्तू पाठवल्या आहेत हे दाखवले आहे. मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सलमानच्या टीमने पाठवलेल्या भेटवस्तूंच्या झलकांमध्ये सांताची लाल टोपी, हॉट चॉकलेट पावडरचा बॉक्स आणि मेणबत्त्या यासारख्या गोष्टी बॉक्समध्ये दिसत आहेत. यासोबत मलायकासाठी भेट म्हणून एक नोटही पाठवण्यात आली आहे.
अरबाज आणि शूराने लग्नानंतरची पहिली झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शूरा एक प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे जी अरबाज खानची दुसरी पत्नी बनली आहे. यापूर्वी, मलायका अरबाजची पत्नी होती आणि 19 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर 2017 मध्ये ते वेगळे झाले.
मलायका अरोराने 1998 मध्ये अरबाज खानशी लग्न केले होते, परंतु दोन्ही स्टार्सने मार्च 2016 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली आणि मे 2017 मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला. त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन दररोज सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही स्टार्स लवकरच लग्न करण्यास तयार आहेत.