आई झाल्यानंतर शेअर केलेल्या 'या' फोटोमुळे सोनम कपूर झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले 'न्यूड होणं फॅशन...'

सोनम कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे. 

Updated: Aug 21, 2022, 04:27 PM IST
आई झाल्यानंतर शेअर केलेल्या 'या' फोटोमुळे सोनम कपूर झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले 'न्यूड होणं फॅशन...' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम काल म्हणजेच शनिवारी आई झाली आहे. सोनम एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर सोनमनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून सोनमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

सोनमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनमनं तिचं व्होग मॅगझिनसाठी केलेलं मॅटर्निटी फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोत सोनमनं शर्ट परिधान केलं आहे. सोनमचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनमच्या या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'तू आई झालीस याचा आनंद आहे, पण इतका बॉडी शो कशाला?' दुसरा नेटकरी म्हणाला, असं फोटोशूट केल्यानं यांची मुलं सोन्याची होणार आहेत का? तिसरा नेटकरी म्हणाला, 'न्यूड होणं फॅशन असेल तर आम्हाला अशा फॅशनची गरज नाही.' आणखी एक नेटकरी म्हणाला, प्रेग्नंसीमध्ये सेमी नेकेड फोटोशूट करणं गरजेचं आहे का? सोनमनं बाळाच्या जन्माआधी व्होग मॅगझिनला मुलाखत दिली होती. 

सोनमला मुलगा झाल्यामुळे अनिल कपूर आता आजोबा झाले आहेत. नातवाच्या जन्मानंतर त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला आहे. त्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांचा आनंद सगळ्यांसोबत शेअर केला आहे.