मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले. त्यानंतर आता आणखी एक जोडपं लग्न बंधनात अडकणार आहे. खरंतर या दोघांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू होत्या. अखेर ते दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. हे सेलिब्रिटी कपल म्हणजे अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) आहे. आता अनुष्का-विराट, दीपिका-रणवीर आणि इतर जोडप्यांप्रमाणेच रिचा आणि अलीही आयुष्याचा नवा अध्याय सुरू करणार आहेत.
माहितीनुसार, रिचा चढ्ढा आणि अली फजलचे प्री-वेडिंग फंक्शन्स 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. एका शाही किल्ल्यावर सगळे कार्यक्रम होणार आहेत. त्यांच्या शाही लग्नात अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. रिचा आणि अली फैझल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पाहूण्याचे आगमन होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम होईल.
आणखी वाचा : पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...
यानंतर 6 तारखेला रिचा अली विवाह बंधनात अडकणार आहेत. ते दिल्लीत लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यांच्या लग्नात कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिचा आणि अली मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहेत. या पार्टीला फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
रिचा आणि अली यांची भेट 'फुक्रे' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली अन् त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. बोल्ड आणि स्पष्टवक्ता रिचानं अलीला प्रपोज केलं. रिचानं प्रपोज केल्यानंतर अलीला धक्काच बसला होता. रिचाला उत्तर देण्यासाठी अलीनं 3 महिन्याचा वेळ घेतला. 5 वर्ष रिलेशनशिप जगापासून लपवल्यानंतर अखेर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले.
आणखी वाचा : समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? शरद पोंक्षे यांचा Video Viral
ऋचा आणि अलीचं लग्न 2020 मध्येच झालं असतं, पण दोघेही प्लॅन करत असतानाच कोरोना व्हायरस आला. या साथीमुळे अनेक महिने सर्व काही विखुरले होते. अशा परिस्थितीत दोघांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर पुन्हा नियोजन करताना कोविड-19 ची दुसरी लाट आली. आता अखेर दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.