Aishwarya Rai : गेले काही दिवस बॉलिवूडचे स्टार कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील वादविवादाच्या चर्चा प्रचंड चर्चेत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे एकमेकांशी पटत नसून ते विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, सध्या केवळ प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावरील चर्चा असून बच्चन कुटूंबातील कोणीही अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. या, चर्चादरम्यान आता सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्यानं आई होण्याच्या विषयावर तिचं मत व्यक्त केलं आहे. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय चा हा व्हिडीओ तिच्या करियरमध्ये पदार्पण करण्याच्या पूर्वीचा आहे. हा साधारण 1994 सालाचा व्हिडिओ आहे. याच वर्षी ऐश्वर्यानं मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. हा एक इंटरव्यू असून लोकप्रिय अभिनेते एम एम फारुकी हे, नुकतीच मिस वर्ल्ड झालेल्या ऐश्वर्या रायची मुलाखत घेताना दिसत आहेत. या मुलाखतीत ‘तुझ्या आयुष्यातील आजवर न विसरता येणारा क्षण कोणता असेल?’ असा प्रश्न एम एम फारुकी यांनी ऐश्वर्याला विचारला आहे.
एम एम फारुकी यांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना ऐश्वर्या म्हणते, ‘माझ्यासाठी न विसरता येणारा क्षण अजूनही माझ्या आयुष्यात आलेला नाही आणि हा तो क्षण असेल जेव्हा मला बाळ होईल..’ मुलाखतीत इतक्या तरुण वयात आई होण्याची इच्छा व्यक्त करणारी ऐश्वर्या चेहऱ्यावर हात ठेवत हसू लागते. तेव्हा उपस्थित लोक टाळ्या वाजवून तिची प्रशंसा करताना दिसतात.मात्र, ऐश्वर्याची इच्छा अनेक वर्षांनंतर पूर्ण झाली. 2007 मध्ये ऐश्वर्या रायनं अभिषेक बच्चन सोबत मोठ्या थाटामाटात लग्न केलं. लग्नाच्या ४ वर्षानंतर 2011 मध्ये ऐश्वर्यानं मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या अभिषेकची लेक आराध्या आता 13 वर्षांची झाली असून ती अनेकदा ऐश्वर्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेताना दिसते.
हेही वाचा : 'त्यांना जे जेवायला असतं तेच पदार्थ आमच्याही जेवणात असतात'; तैमुरच्या नॅनीचे सैफ-करीनाबद्दल रंजक खुलासे
आपल्या अनेक मुलाखतींमध्ये ऐश्वर्या आपली लाडकी लेक आराध्याबद्दल भरभरून बोलताना तिचे कौतुक करताना दिसते. सोशल मीडियावर देखील आराध्याचे आपल्या आईसोबतचे फोटो व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतात. आराध्या सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत असून लवकरच ती परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार असल्याचे म्हटले जाते. मात्र, सध्या रंगत असलेल्या अभिषेक ऐश्वर्यच्या घटस्फोटाच्या चर्चमध्ये ऐश्वर्या देखील आराध्यासोबत परदेशात जाणार असल्याचा चर्चा समोर येत आहेत.