मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ला चाहते अतिशय पसंत करतात. तिच्या लूकसोबतच तिच्या फॅशन सेन्सची देखील जोरदार चर्चा रंगते. पण यावेळी ती सोशल मीडियावर चक्क ट्रोल झाली आहे. याला कारण ठरली आलियाची फॅशन. आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती एअरपोर्टवर दिसत आहे.
आलिया (Alia Bhatt) भट्टचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.
या व्हिडिओत आलिया आर्ड सेट ड्रेसमध्ये दिसली. आलिया अतिशय घाईत असल्यामुळे पापाराझीसमोर पोझ देताना दिसली नाही.
या व्हिडीओ ती मला एअरपोर्टला जायचंय... असं म्हणत निघून गेली. पण तिचा ड्रेस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तिला या ड्रेसमुळे ट्रोल करण्यात आलं.
आलियाच्या ड्रेसवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ड्रेसमध्ये लाईट लावली आहे का? दुसऱ्या कमेंटमध्ये म्हटलं आहे की, नाईट ड्रेसमध्ये का आलीस?
तर तिसऱ्या म्हटलंय नाईट ड्रेस तर बदलून घ्यायचं. तर काहींना आलियाचा लूक आवडला आहे. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया देऊन कौतुक केलं आहे.
सध्या आलिया भट्ट तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
हा चित्रपट 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि विजय राज देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकाच्या अध्यायावर आधारित आहे. ज्यात कामाठीपुराच्या माफिया गंगूबाई कोठेवालीबद्दल सांगितले आहे.