मुलीची पाठवणी करताना ढसा-ढसा रडले हे सेलिब्रिटी... अमिताभ बच्चन यांचे अश्रू थांबेना

मुलीची पाठवणी करताना फक्त महेश भट्ट नाही, तर या  सेलिब्रिटींचं देखील अश्रू थांबेना  

Updated: Apr 18, 2022, 02:14 PM IST
मुलीची पाठवणी करताना ढसा-ढसा रडले हे सेलिब्रिटी... अमिताभ बच्चन यांचे अश्रू थांबेना title=

मुंबई : वडील आणि मुलीचं नातं फार घट्ट आणि वेगळं असतं. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते, तेव्हा वडील सर्वांसमोर हसण्याचा देखावा करत असतात, पण मनातून एका मुलीचा बाप पूर्ण पणे खचलेला असतो.. मुलीची पाठवणी करताना वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही.. ही वेळ अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्यात देखील आली....

महेश भट्ट 
महेश भट्ट यांनी नुकताचं मुलीचं कन्यादान केलं. सोशल मीडियावर आलिया, रणबीर आणि महेश भट्ट यांनी अनेक भावनिक फोटो देखील व्हायरल झाले. 

ऋषी कपूर
ऋणी कपूर यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यामुळे ते रणबीरच्या लग्नात उपस्थित राहू शकले नाहीत. पण मुलगी रिद्धीमाच्या लग्नात मात्र ऋषी कपूर यांच्या डोळ्यात पाणी होत.

अमिताभ बच्चन 
महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मुलीची सासरी पाठवणी केली आहे. श्वेता नंदा ही  अमिताभ बच्चन यांची लाडकी मुलगी आहे. मुलीला सासरी पाठवताना अमिताभ बच्चन यांचे अश्रू थांबत नव्हते. 

सलिम खान
सलिम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतलं.  तिचा पोटच्या मुलीसारखा सांभाळ केला. त्यानंतर खान कुटुंबाने अर्पिताचं लग्न देखील केलं. अर्पिताची सासरी पाठवणी करताना सलिम खान रडले होते. 

रजनीकांत 
रजनीकांत देखील मुलींच्या लग्नात प्रचंड रडले. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांच्या एका मुलीचा घटस्फोट झाला. तेव्हा त्यांच्या लेकी लेकीच्या घटस्फोटाची चर्चा तुफान रंगली.