अरे देवा... हीचा आवाज ऐकून रणबीर आलियालाही विसरेल, पाहा Video

रणबीरच्या आयुष्यात दुसरी आलिया? नेटकऱ्यांचाही उडाला गोंधळ  

Updated: Sep 14, 2022, 11:15 AM IST
अरे देवा... हीचा आवाज ऐकून रणबीर आलियालाही विसरेल, पाहा Video

मुंबई : प्रेग्नेंसीच्या गोड बातमीनंतर अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमामुळे चर्चेत आहे. जोरदार प्रमोशन केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिनेमा कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहे. दरम्यान एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये तरुणीने चक्क आलियाचे ब्रम्हास्त्रमधील डायलॉग्स तिने अत्यंत फनी अंदाजात उच्चारले आहेत. 

तरुणीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हासू आवरणार नाही. आलियाची मिमिक्री करणाऱ्या तरुणीचं नाव चांदनी असं आहे. यापूर्वीही तीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची मिमिक्री केली आहे. दरम्यान, आलियाच्या मिमिक्रिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

)

चांदनीचा व्हिडीओ आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. शिवाय यावर विविध प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत.  सध्या सर्वत्र चांदनीच्या व्हिडीओची चर्चा आहे. 

 'ब्रह्मास्त्र' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, मागच्या आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अनेक सिनेमांना बॉयकॉटचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, प्रदर्शनापुर्वी  'ब्रह्मास्त्र' सिनेमाला देखील अनेकांनी विरोध केला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहे.