अमिताभ बच्चन मुकेश अंबानींच्या मुलांसोबत खेळले KBC, अनेक गोष्टींचा खुलासा

रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच त्यांचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला.

Updated: Dec 26, 2017, 05:11 PM IST
अमिताभ बच्चन मुकेश अंबानींच्या मुलांसोबत खेळले KBC, अनेक गोष्टींचा खुलासा title=

नवी दिल्‍ली : रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच त्यांचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला.

यानिमित्ताने रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांनी माहिती दिली की, रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या १६ कोटींपर्यंत पोहचली आहे. एका शानदार सोहळ्यात अमिताभ बच्चन यांनी मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांसोबत म्हणजे आकाश, ईशा आणि अनंत अंबानीसोबत KBC हा खेळ खेळला. 

या खास KBC शोमध्ये मुकेश अंबानींच्या मुलांना रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातून अशा काही गोष्टी समोर आल्या ज्या आजपर्यंत अनेकांना माहितही नव्हत्या. चला जाणून घेऊया असेच काही खास प्रश्न आणि त्यांचं उत्तरं....

प्रश्न क्रमांक १ - रिलायन्सचा सर्वात पहिला व्यवसाय कोणता होता?

उत्तर - मसाले. अनेकांना असं वाटतं की, रिलायन्सचा पहिला बिझनेस पेट्रोकेमिकल किंवा टेक्सटाईल होता. पण रिलायन्सचा पहिला बिझनेस मसाल्यांचा होता. हा बिझनेस धीरूभाई अंबानी यांनी सुरू केला होता. त्यानंतर रिलायन्स इतर बिझनेसमध्ये उतरली. 

प्रश्न क्रमांक २ - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर साईटमध्ये सर्वात जास्त कशाचं प्रॉडक्शन होतं?

उत्तर - आंबा. रिलायन्सच्या रिफायनरीबाबत अनेकांना माहिती आहे. पण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर साईटमध्ये प्रत्येक वर्षी १४० प्रकारच्या ६०० टन आंब्यांचं उत्पादन होतं. 

प्रश्न क्रमांक ३ - फायनॅन्शिअल ईअर २०१६-१७ मध्ये रिलाय्नन्स इंडस्ट्रीजचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी खर्च किती होता?

उत्तर - यादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचा सीएसआर ६७४ कोटी रूपये इतका राहिला. देशातील सर्वात मोठी फाऊंडेशन रिलायन्स फाऊंडेशन १३ राज्यांमध्ये सक्रीय आहे. या फाऊंडेशनकडून या राज्यांमध्ये १ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त लोकांना मदत केली जाते. 

प्रश्न क्रमांक ४ - रिलायन्स रिटेल स्टोरमध्ये प्रत्येक महिन्यात किती ग्राहक येतात?

उत्तर - देशातील ८०० शहरांमध्ये रिलायन्स रिटेलचे ३७०० स्टोर आहेत. प्रत्येक महिन्यात रिटेल स्टोरमध्ये साधारण १.५ कोटी ग्राहक येतात. 

प्रश्न क्रमांक ५ - रिलायन्स जिओ १० कोटी सब्सक्राईबर्सचा आकडा किती वेळात पूर्ण केला?

उत्तर - देशातील सर्वात नेटवर्क असलेल्या रिलायन्स जिओने सहा महिन्यांपेक्षा कमी वेळात १० कोटी सब्सक्रायबर्सचा आकडा पूर्ण केला होता. जिओचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 

प्रश्न क्रमांक ६ - रिलायन्स इंडस्ट्रीज किती देशांमध्ये आपले प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करते?

उत्तर - रिलायन्स इंडस्ट्रीज आपले अनेक प्रॉडक्ट्स जगातील १०८ देशांमध्ये एक्सपोर्ट करते. देशातील एकूण एक्सपोर्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा १४ टक्के योगदान आहे.