कलाविश्वात हळहळ; आणखी एका सेलिब्रिटीचा कॅन्सरनं मृत्यू

मलायका अरोरा, रिद्धीमा कपूरनं वाहिली श्रद्धांजली...   

Updated: Aug 12, 2020, 07:23 PM IST
कलाविश्वात हळहळ; आणखी एका सेलिब्रिटीचा कॅन्सरनं मृत्यू  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाच्या कॅन्सरची लागण झाल्याचं निदान झालं आणि चाहत्यांच्या मनात कालवाकालव झाली. यातून चाहते सावरत नाहीत, तोच याच कलावर्तुळातून आणखी एक वाईट बातमी समोर आली. ज्यामध्ये कॅन्सरमुळं एका लोकप्रिय सेलिब्रिटीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री मलायका अरोरा, रिद्धीमा कपूर, श्वेता बच्चन यांनी तिला श्रद्धांजलीही वाहिली. 

कॅन्सरशी झुंज देताना आयुष्याच्या या लढाईत माघार पत्करलेली ही सेलिब्रिटी म्हणजे सिमर दुगल. मॉडेलिंग आणि फॅशन डिझायनिंग या क्षेत्रांमध्ये नावाजलेल्या सिमर यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. ज्यामुळं पुन्हा एकदा या झगमगाटाच्या दुनियेला हादरा बसला. 

मलायकानं सिमर यांच्याविषयीची पोस्ट लिहित त्यात म्हटलं, 'माझे डोळे भरुन आले आहे. मला रडू थांबवणं आता शक्य नाही. माझी फार चांगली मैत्रीण, माझी जोडीदार.... तुझी फार फार आठवण येईल. तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो'. मलायकाच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक बॉलिवूडकरांनी सिमर यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 

रिद्धीमा कपूर हिनं इन्स्टा स्टोरीमध्ये सिमर यांचा फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर, रितू कुमार या नावाजलेल्या फॅशन डिझायनरनं सिमर यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

 
 
 
 

With a heavy heart today we got the news that Simar Duggal is no more. She passed away last night at 2.30 at her mother Rita Sawhneys home , at a very young age of 52 years. I have known the family for a long time,from my childhood in Amritsar where they lived. Initially they were conservative and wary of her desire to become a model. Her first assignment was a rather naive shoot at our show room, when she was in her teens.Subsequently Simar moved on to become one of the most known faces on the indian ramp and was a muse for many design houses. She was special to me, and modelled for my book “The Costumes and Textiles of Royal India”, —in picture, as well as for a dozen or more Tree of Life shows that we did, telling the story of indian crafts. We all travelled all over the world and she was particularly interested in history and content. On the ramp, she brought to the table a grace, attitude and intelligence, as well as beauty which was all her own and rare in the world of fashion. Her body language told a story which conveyed much more than the clothes she wore. She was highly intelligent, a wonderful human being and a friend as we shared a love for textiles. She fought a very difficult battle, for several years now, with cancer, and survived the years she lived ,with a brave face which was exemplary. For me her passing away , seems as if an era of fashion in india has also gone, perhaps not ever to come back again in quite the same way.I have also lost a friend , and a muse. She will be truly missed. My deepest condolences to her family, who have been pillars of strength through her tough journey to the end. - Ritu Kumar

A post shared by Ritu Kumar (@ritukumarhq) on

'माझ्यासाठी तिचं जाणं म्हणजे भारतीय फॅशन जगतातील एका काळातात अंत होण्याप्रमाणं आहे. मी अर्थातच एक चांगली मैत्रीण गमावली आहे. तिची कायमच आठवण येईल', असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. याव्यतिरिक्तही बऱ्याच सेलिब्रिटींनी सिमर यांना श्रद्धांजली वाहिली.