मुंबई : हुमा कुरेशी (huma qureshi) ही नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. हुमा कुरेशीच्या वाढदिवशी तिला फॅन्स (Fans) आणि सेलेब्सकडून खास शुभेच्छा मिळाल्या. तिने चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारुन बॉलीवूडमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं. आज हुमा कुरेशीची गणना बी टाऊनमधील बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. पण तुम्हाला माहितेय का तिचा दिल्ली ते बॉलिवूडचा प्रवास कसा झाला ते? (Anurag Kashyap made this actress dream come true nz)
हुमा कुरेशीचा जन्म 28 जुलै 1986 रोजी दिल्लीत झाला. हुमा कुरेशीनेही तिचे शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून केलं. तिनं इतिहास या विषयात बॅचलर डिग्री घेतली. तिनं बालपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. एका सामान्य मुलीसाठी थोडं कठीणच होते. पण तिनं मात्र जिद्द सोडली नाही माहितीसार, हुमा कुरेशीने कॉलेज संपल्यानंतर थिएटरमध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे अभिनेत्री बनण्याच्या मार्गाला सुरुवात केली.
ते अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हुमा कुरेशी 2008 मध्ये दिल्लीहून मुंबईला आली तिनं अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन्सदेखील दिले त्यातून तिची एका चित्रपटासाठी निवड ही झाली पण तो चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. पण तिने पराभव स्वीकारला नाही. शेवटी इतक्या परिश्रम केल्यानंतर तिला आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. आमिर खानसोबत केलेल्या जाहीरीनं हुमा कुरेशीचं आयुष्यच बदलून टाकलं.
2012 मध्ये हुमा कुरेशीने गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. माहितीनुसार अनुराग कश्यपने पहिल्यांदा हुमा कुरेशीला एका जाहिरातीमध्ये पाहिले आणि त्यानंतर तो हुमा कुरेशीच्या अभिनयाने प्रभावित झाला आणि त्याने तिला आपली नायिका बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटातील हुमा कुरेशीची भूमिका प्रेक्षकांना आवडली आणि त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.
त्यांनतर हुमा कुरेशीने एकामागोमाग बदलापूर, डायने, जॉली एलएलबीमध्येही काम केले आहे. खूप कमी लोकांमध्ये आपली स्वप्न साकार करण्याचे धाडस फार कमी असते. हुमा कुरेशीही त्यापैकीच एक. आज तिनं घेतलेल्या मेहनतीमुळे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव बनले आहे.
हुमा कुरेशीचा लवकरच डबल एक्सल (Double Xl) हा चित्रपट येणार आहे. त्या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्या चित्रपटाचा टिजर रिलीज झाला आहे. त्याचा टिजर पाहून लोकांनी पसंती दर्शवली आहे.