'तो गरीब का दिसतोय?'; बॉयफ्रेन्डसोबत फोटो पोस्ट करताचं अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

 दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.

Updated: May 12, 2021, 05:57 PM IST
'तो गरीब का दिसतोय?'; बॉयफ्रेन्डसोबत फोटो पोस्ट करताचं अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल  title=

मुंबई : बॉलिवूडकरांची मुलं कायम लाईमलाईटमध्ये असतात. सध्या स्टारकिड्सची चर्चा सर्वत्र रंगत आहे. दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. अभिनेत्री नसली तरी तिच्या चर्चा मात्र कायम रंगत असातात. सतत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणारी आलिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आलियाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो तिच्या बॉयफ्रेन्डसोबतचा आहे. आलियाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

आलियाच्या बॉयफ्रेन्डचं नाव शेन ग्रीगोइरे आहे. फोटोमध्ये आलिया त्याच्यासोबत पोज देताना दिसत आहे.  आलियाचा तिच्या बॉयफ्रेन्डसोबत फोटो व्हायरल होताचं सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. तर तिच्या बॉयफ्रेन्डची खिल्ली उडवली जात आहे. एका युजरने 'तुझा बॉयफ्रेन्ड गरीब का दिसतोय? ' असं विचारं तर दुसऱ्या युजरने 'वडिलांवर गेली आहे.' असं म्हटलं आहे. 

एवढचं नाही तर 'लंगूर के हात मे अंगूर' अशी कमेंट देखील तिच्या फोटोवर आली आहे. आली. या आधी देखील आलियाने बॉयफ्रेन्डसोबत अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आलिया ही अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे.