AP Dhillon and Khushi Kapoor Dating : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ही सध्या तिच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणामुळे चर्चेत आहे. खुशी लवकरच 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. इतकं सुरु असताना दुसरीकडे खुशी कपूरचं नाव हे गायक एपी ढिल्लोंसोबत जोडले जात आहे. त्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर काही नेटकऱ्यांना आनंद झालेला नाही. त्यामुळे नेटकरी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. त्याचं कारण काय आहे आणि याची सुरुवात कुठुन झाली आहे हे जाणून घेऊया...
AP Dhillon विषयी काही सांगायची गरज नाही कारण त्याचे लाखो चाहते आहेत. त्याची गाणी ही चांगलीच लोकप्रिय आहेत. तर त्याच्या कॉन्सर्ट्सला प्रेक्षक चांगलीच गर्दी करतात. त्याच्या कॉन्सर्ट्सला फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रिटी देखील हजेरी लावताना दिसतात. AP Dhillon ची नेहमीच वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतात. आता AP Dhillon चा एक नवीन गाणं आलं असून त्याचं नाव 'ट्रू स्टोरीज' असे आहे. या गाण्याच्या लिरिक्समध्ये AP Dhillon नं खुशी कपूरचं नाव घेतलं आहे. यात AP Dhillon बोलताना दिसतो की 'जदों हस्से ता लागे तू खुशी कपूर' याचा अर्थ असा आहे की जेव्हा तू हसतेस तेव्हा तू खूशी कपूरसारखी दिसते. AP Dhillon नं त्याच्या गाण्यात खुशी कपूरचं नाव घेतल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. इतकंच काय तर दुसरीकडे त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेही वाचा : बाळाला जन्म दिल्यानंतर आता अशी दिसतेय दीपिका; पतीनं फोटो शेअर करताच वळल्या नजरा
दरम्यान, त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर काहीही वक्तव्य केले नाही किंवा पोस्ट शेअर केलेली नाही. एपी ढिल्लोननं नुकतीच NMACC म्हणजेच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंगमध्ये परफॉर्म केलं होतं. त्यानंतर एपी ढिल्लोन मुंबईतील लोलापालूजासाठी परफॉर्म केले होते. तर डिसेंबर 2021 मध्ये एपी ढिल्लोनच्या एका कॉन्सर्टमध्ये जान्हवी कपूरनं हजेरी लावली होती. तर खूशी कपूरच्या 'द आर्चीज' या चित्रपटाचे निर्माते नेटफ्लिक्सनं Tudum इव्हेंटमध्ये चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. खुशीसोबत या चित्रपटात शाहरुख खानची लेक सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. तर चित्रपटाचा टीझर हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. निर्मात्यांनी अजून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारखेची घोषणा केलेली नाही.