AR Rahman's Wife Takes His Side : लोकप्रिय म्युजिक कंपोजर एआर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानोनं काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर एआर रहमानला घेऊन लोकं काय काय बोलत आहेत. ज्या दिवशी एआर रहमाननं पत्नीसोबत विभक्त होणार असल्याची घोषणा केली. त्याच्या काही काळानंतक एआर रहमानच्या टीममधील मोहिनी डेनं देखील पतीपासून विभक्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सोशल मीडियावर लोकं एआर रहमान आणि मोहिनी डेच्या लिंकअपच्या चर्चा करु लागले. आता या सगळ्या बातम्यांमध्ये सायरा बानोनं प्रतिक्रिया दिली आहे.
सायरा बानोनं तिच्या पीआरकडून एक वॉइस नोट शेअर केली आहे. या वॉइस नोटमध्ये सायरा बानोनं सांगितलं की 'तिची तब्येत ठीक नाही आहे आणि ती तिच्या उपचारासाठी मुंबईमध्ये आहे. सायरा बानोनं सांगितलं की याच कारणामुळे मी एआरपासून ब्रेक घेते. मी यूट्युबर्स आणि तमिळ मीडियाला विनंती करते की त्याच्या विषयी काही वाईट बोलू नका. एआर रहमान आणि मोहिनी डेच्या लिंकअपविषयी बोलताना सायरानं एआर रहमानला जगातील सगळ्यात चांगली व्यक्ती म्हटलं आहे. माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मला चेन्नईला यावं लागलं. चेन्नईमध्ये मी त्याच्या बिझी शेड्युलमुळे हे शक्य होतं नव्हतं.'
एआर रहमान किती चांगले व्यक्ती आहेत ज्याविषयी बोलताना सायरा बानोनं सांगितलं की 'मी त्याच्यावर माझ्या पुढच्या आयुष्याला घेऊन विश्वास करते. मी त्याच्यावर इतकं प्रेम करते आणि तो देखील माझ्यावर तितकंच प्रेम करतो. मी तुम्हाला विनंती करते की त्याच्या विरोधात खोट्या अफवा पसरवनं बंद करा. देव तुम्हाला सगळ्यांना आनंदी ठेवो आणि मी प्रार्थना करते की आम्हाला एकटं सोडा.'
हेही वाचा : 'मी पोलिसांसमोर...', 26 वर्ष जुन्या व्हिडीओवरून सलमान खानला होतोय पश्चाताप
सायरानं सगळ्यांना सांगितलं की 'ती चेन्नई जाण्याची प्रतीक्षा करते. आम्ही अजून काही अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. तिनं तिच्या सगळ्या गोष्टी तिथे संपवत म्हटलं की त्याचा प्रतिमा खराब करणं बंद करा.'