Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात दिलासा मिळाला आहे. आर्यन खानविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयने याचिकादाराला परवानगी दिली आहे. ड्रग्ज प्रकरणातून आर्यनचं नाव वगळण्यात आलं होतं. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण आता आव्हन देण्यात आलेली याचिका मागे घेण्यात आल्यामुळे आर्यनला दिलासा मिळाला आहे. (Aryan Khan Drugs Case)
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 2021 मध्ये ऑक्टोबरमध्ये ड्रग्स प्रकरण बाहेर आलं होतं. या प्रकरणी आर्यन खानसह अनेकांना एनसीबीने चौकशीनंतर अटक केली होती. एवढंच नाही, तर न्यायालयाच्या आदेशानुसार आर्यनखानसह अनेकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (Know What Is Aryan Khan Drugs Case) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कर्देलिया क्रूझ शिपमध्ये ड्रग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. एनसीबीने या क्रुझवर छापा टाकून काही लोकांना अटक केली होती. यामध्ये आर्यन खानलाही अटक करण्यात आली होती. एनसीबीने दावा केला आहे की आर्यन खानकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले असून तो आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलिंग ग्रुपचा भाग आहे.
हेही वाचा : 'सगळं चुकीचं होतं आणि...', सातपुडा टायगर रिजर्व वादावर Raveena Tandon चं स्पष्टीकरण
अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर आर्यन खानला जामीन मिळाला. आर्यनविरोधात कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने त्याला न्यायालयाने क्लिन चिट दिली. पण त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. पण यातून देखील शाहरुखच्या मुलाला दिलासा मिळाला आहे.
आर्यन खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये, आर्यन अभिनेता म्हणून नाही, तर लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये त्याचं नशीब आजमावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खान हा 27 वर्षांचा असून त्याने स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, 2020 मध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शन पदवी प्राप्त केली. (Aryan Khan Bollywood Debute as A Writer)