मुंबई : आर्यन खान ड्रग प्रकरणात, दररोज नवीन खुलासे होत आहेत. आर्यन खान बद्दल एक मोठी बातमी येत आहे, ज्याला क्रूजवरील रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्स वापरल्याच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. आर्यनचे वडील शाहरुख खान आपल्या मुलाला ड्रग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एनसीबीच्या परवानगीने भेटले आणि आर्यन खान या बैठकीदरम्यान ढसाढसा रडल्याचे वृत्त आहे. आर्यन खानने वडिलांना पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले असे वृत्त आहेत. ही भेट फक्त काही मिनिटे चालली.
या भेटीसाठी शाहरुखला एजन्सीची परवानगी घ्यावी लागली. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, शाहरुख त्याच्या पत्नी गौरी खानसोबत त्यांच्या मुलासाठी बर्गर घेऊन आला होता पण एनसीबीने त्यासाठी नकार दिला. मुलगा आर्यनला रडताना पाहून वडील शाहरुखही हतबल झाला. शाहरुखनेही आर्यनला लवकरच तुरुंगातून मुक्त करण्याचे आश्वासन दिले.
आर्यन 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत आहे आणि त्याचे वडील शाहरुख वकिलांद्वारे त्याला जामीन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आर्यनकडून सुप्रसिद्ध वकील सतीश मनेशिंदे न्यायालयात प्रतिनिधित्व करत आहेत. आर्यनला जामीन मिळावा म्हणून ते रात्रंदिवस व्यस्त आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करणारी ड्रग इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NCB ने आर्यन खानसह अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, इश्मीत सिंग, नुपूर सारिका, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि मोहक जयस्वाल यांना अटक केली आहे. या सगळ्या व्यतिरिक्त, दोन ड्रग्ज विक्रेत्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक म्हणजे अरबाज सेठ मर्चंटचा मित्र श्रेयस नय्यर आहे.